• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

“व्याघ्र संवर्धन चळवळीची पताका घेऊन जळगाव ते पाल जनजागृती रॅलीस उत्साहात सुरुवात”

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 28, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
“व्याघ्र संवर्धन चळवळीची पताका घेऊन जळगाव ते पाल जनजागृती रॅलीस उत्साहात सुरुवात”
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ जुलै २०२५

जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येवर वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव आणि यावल वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीस आज जळगाव येथून उत्साहात सुरुवात झाली. या रॅलीला आमदार राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.

उप वनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या दोन दिवसांच्या रॅलीमध्ये राज्यभरातून आलेले १०० व्याघ्रदूत आणि विवेकानंद प्रतिष्ठानचे २५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. रॅलीस विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला असून यावल वनविभागाकडून त्यांना जंगल सफारीचा अनुभव देण्यात येणार आहे. नशिराबाद, भुसावळ, सावदा, फैजपूरमार्गे पाल या ठिकाणी २९ जुलै रोजी हा जनजागृती कार्यक्रम संपन्न होईल.

रॅली दरम्यान “वाघ वाचवा, जंगल वाचवा” असा संदेश देत विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. जंगलाच्या प्रतिकृतीसारख्या सजवलेल्या सफारी वाहनावर उभे असलेले दोन मानवी वाघ विशेष आकर्षण ठरले. नागरीकांनी या मानवी वाघांसोबत सेल्फी काढून रॅलीचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण देवरे यांनी केले. संस्थेचे उपाध्यक्ष मुकेश सोनार, सतीश कांबळे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यावल वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

२९ जुलै रोजी पाल येथे विवेकानंद प्रतिष्ठानच्या शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांना जंगल सफारी टी-शर्ट वाटप, दुर्गम भागातील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना व वनमजुरांना चटई वाटप, वृक्षारोपण व बिजारोपण यासारखे कार्यक्रम उप वनसंरक्षक जमीर शेख यांच्या हस्ते पार पडणार आहेत. सचिव योगेश गालफाडे यांनी ही माहिती दिली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यावल वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच वन्यजीव संस्थेचे रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, सतीश कांबळे, मुकेश सोनार यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील स्वयंसेवी संस्था, ट्रेकर्स ग्रुप आणि वन्यजीवप्रेमी कार्यरत आहेत.

Related Posts

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !
जळगाव

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !

June 19, 2026
गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !
जळगाव

गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !

June 19, 2026
मुंबईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नशिराबादच्या नगराध्यक्ष पाटील कुटुंबावर शोककळा  !
क्राईम

मुंबईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नशिराबादच्या नगराध्यक्ष पाटील कुटुंबावर शोककळा !

June 19, 2026
जामनेरात कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला पहाटे आग; घातपाताची शक्यता !
क्राईम

जामनेरात कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला पहाटे आग; घातपाताची शक्यता !

June 19, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

१० कोटींच्या कर्जाचे आमिष; प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ५ लाखांची फसवणूक! !

June 19, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात !
जळगाव

विचार वारसा फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात !

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !

June 19, 2026
गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !

गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !

June 19, 2026
मुंबईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नशिराबादच्या नगराध्यक्ष पाटील कुटुंबावर शोककळा  !

मुंबईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नशिराबादच्या नगराध्यक्ष पाटील कुटुंबावर शोककळा !

June 19, 2026
जामनेरात कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला पहाटे आग; घातपाताची शक्यता !

जामनेरात कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला पहाटे आग; घातपाताची शक्यता !

June 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group