
जळगाव मिरर | ११ ऑगस्ट २०२५
गेल्या काही महिन्यांपासून जळगाव महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ.घोलप हे एका महिला सहकारी यांना मानसिक छळ करत असल्याच्या आरोपाखाली त्यांचे निलंबन झाले आहे. मात्र आता महिलेच्या सहा पानी जबाबमध्ये अनेक खळबळजनक खुलासे बाहेर आले आहे. या प्रकरणात पीडित महिलेने तक्रार मागे घ्यावी यासाठी एका ठेकेदाराने चक्क बंदुकीचा धाक दाखवल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी बंदूकधारी ठेकेदारांचे संरक्षण घेता की काय असा संशय या प्रकरणात येत आहे.
जळगाव महानगरपालिका नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत येत असते. गेल्या काही दिवसापासून जळगाव महानगरपालिकेतील वैद्यकीय विभागातील डॉ.घोलप हे दोन ते तीन प्रकरणात त्यांचे नाव येत आहे. त्यांच्यावर मनपा आयुक्तांनी देखील कारवाई केली आहे मात्र ही कारवाई झाल्यावर देखील डॉ.घोलप यांच्या मार्फत एका ठेकेदाराने पीडित महिलेला चक्क महानगरपालिकेच्या दवाखाना कार्यालयात येऊन बंदूक दाखवून तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिली असल्याचे देखील महिलेने आपल्या जबाब म्हटले आहे. त्यामुळे जळगाव महानगरपालिकेतील अधिकारी बंदूकधारी ठेकेदारांचे संरक्षण घेता की काय अशी चर्चा शहरात सुरू आहे.
‘त्या’ ठेकेदाराची चौकशी होणार का ?
महानगरपालिकेच्या दवाखाना कार्यालयात चक्क एक ठेकेदार बंदुकीचा धाक दाखवून एका पीडित महिलेला तिची तक्रार मागे घेण्यास धमकी देत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून मनपा आयुक्तांनी याची लागलीच दखल घेऊन हे प्रकरण आता थेट पोलिसांकडे द्यायला हवे व त्या ठेकेदाराची देखील कसून चौकशी व्हावी अशी मागणी देखील होत आहे.




















