
जळगाव मिरर | १४ ऑगस्ट २०२५
मागील वादाच्या कारणावरुन सुनिल रससिंग पाटील (वय ४९, रा. खोटेनगर) यांना तिघांनी बेदम मारहाण केली. संदीप सुरवाडे याने लोखंडी पाईप सुनिल पाटील यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. ११ रोजी दुपारी दीड वाजता भुसावळ रोडवरील स्वामी नारायण मंदिरासमोरील गॅरेजवर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील खोटे नगर परिसरात सुनिल नससिंग पाटील हे वास्तव्यास आहे. दि. ११ रोजी जून्या भांडणाच्या कारणावरुन संशयित संशयित फुलचंद महाजन त्यांचा मुलगा करण महाजन, संदीप सुरवाडे या तिघांनी भुसावळ रोडवरील स्वामी नारायण मंदिरासमोर असलेल्या गॅरेजवर शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली.
संदीप सुरवाडे याने तेथे पडलेला लोखंडी पाईप उचलून तो सुनिल पाटील यांच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी त्यांचा मित्र सोपान नामदेव माळी हा भांडण सोडविण्याकरीता आला असता, त्याच्या डोक्यात देखील लोखंडी पाईप मारुन गंभीर जखमी केले. जखमींवर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी दि. १२ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित फुलचंद महाजन त्यांचा मुलगा करण महाजन (दोघ रा. खोटेनगर), संदीप सुरवाडे (रा. दादावाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ संजीव मोरे हे करीत आहे.




















