
जळगाव मिरर | २२ ऑगस्ट २०२५
रावेर तालुक्यातील निंभोरा येथे कृषी तंत्र विद्यालयात नव्याने रुजू झालेले फैजपूर विभागीय नूतन डी वाय एस पी बडगुजर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची सभा संपन्न झाली.
यावेळी निंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनी हरिदास बोचरे साहेब यांनी पोलीस ठाणे अंतर्गत 29 गावाचे पोलीस पाटील शांतता समिती सदस्य सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांना बोलवून शांतता समितीचे आयोजन केले व सभेपुढे आपले प्रास्ताविक भाषण केले त्यानंतर डीवायएसपी बडगुजर साहेब यांनी गणेश मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना मिरवणूक व विसर्जन शांततेत करावे असे आव्हान केले या कार्यक्रमाला शांतता समिती सदस्य पोलीस पाटील ग्रामस्थ पत्रकार पीएसआय दिपाली पाटील होमगार्ड गोपनीय शाखा पोलीस हवालदार सुरेश पवार अमोल वाघ यांची उपस्थिती होती…





















