जळगाव मिरर | २३ ऑगस्ट २०२५
अँड्रॉइडमध्ये अनेक महत्वाचे अपडेट येत असतांना सध्या अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या फोनमधील कॉल आणि डायलर सेटिंग्समध्ये अचानक बदल झाल्याचे दिसत आहे. याबाबत कोणतीही अपडेट किंवा अलर्ट देण्यात आली नव्हती. त्यामुळे अँड्रॉइड युझरचा देखील गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. कॉलिंग इंटरफेसमध्ये झालेल्या या बदलामुळे अनेक अँड्रॉइड युजर्स चकित झाले आहेत. तसेच अनेकांकडून हा बदल करण्यामागचे नेमकं कारण काय आहे? अशी विचारणा केली जात आहे.
तर हा बदल फक्त त्या स्मार्टफोनमध्ये झाला आहे ज्यामध्ये गुगल फोन अॅप ‘डायलर अॅप’ म्हणून सेट केले आहे. गुगलने त्यांच्या फोन अॅपमध्ये मटेरियल 3 एक्सप्रेसिव्ह रिडीझाइन लागू केले आहे, जे आता वापरकर्त्यांपर्यंत पोहोचू लागले आहे. हे नवीन डिझाइन खास करून जास्त आधुनिक, सोपे आणि वापरकर्ता-अनुकूल बनवण्यासाठी डिझाइन केले आहे. यातील सर्वात मोठा बदल अॅपच्या नेव्हिगेशन स्टाइलमध्ये मिळत आहे. Call Dialer Screen Change |
नेमका काय झाला बदलं?
नवीन बदलानंतर अॅपमध्ये आता तीन टॅब आहेत. Favorites आणि Recents यांना एकत्र करून Home टॅब तयार केला आहे. या होम टॅबमध्ये तुमची कॉल हिस्ट्री दिसेल आणि वरच्या बाजूला बार/कॅरोसेलमध्ये तुमचे फेवरेट कॉन्टॅक्ट्स दिसतील. त्यामुळे वारंवार कॉन्टॅक्ट शोधायची गरज लगणार नाही. Call Dialer Screen Change |
- Incoming call स्क्रीनलाही नवीन लुक दिला आहे. आता कॉल रिसीव किंवा रिजेक्ट करण्यासाठी तुम्हाला हॉरिझॉन्टल स्वाइप किंवा सिंगल टॅपचा ऑप्शन मिळेल. हे तुम्ही Settings > Incoming call gesture मधून सेट करू शकता.
- In-call इंटरफेसमध्येही मोठा बदल दिसून येतो. आता कॉलदरम्यानचे बटणं पिल-शेपमध्ये दिसतात आणि निवडल्यावर ते राउंडेड रेक्टॅंगलमध्ये बदलतात. End Call बटण आधीपेक्षा मोठं केल्याने कॉल डिस्कनेक्ट करणं सोपं झालं आहे.
- Keypad सेक्शनलाही नवीन डिझाइन मिळालं आहे. आधी हा Floating Action Button वरून उघडत होता, पण आता तो स्वतंत्र टॅब बनवला आहे. नंबर पॅड आता गोलाकार डिझाइनमध्ये दिसतो, ज्यामुळे इंटरफेस अधिक क्लीन दिसतो.
- Contacts सेक्शनला आता नवीन नेव्हिगेशन ड्रॉवरमध्ये आणलं आहे. हे अॅपच्या सर्च फील्डमधून अॅक्सेस करता येईल. यात Contacts शिवाय Settings, Clear call history आणि Help & feedback ऑप्शन्स पाहायला मिळतात.
नवीन फीचर कसे हटवाल?
One Plus ने आपल्या वापरकर्त्यांना याबाबत पर्याय दिला असून यासाठी कॉलिंग अॅपवर काही वेळ टॅप करावे लागेल. त्यानंतर अॅपइन्फोचे Optionदिसेल. आता हे ओपन करून “अनइन्स्टॉल अपडेट” करता येईल. यानंतर हे नवीन फीचर हटवण्यात येईल.