• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

“दोन गाड्या दिल्या… तरी ‘ती’ अपुरीच वाटली – ३६ लाखांच्या हुंड्यासाठी निक्कीला पेटवून दिलं!”

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 24, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
“दोन गाड्या दिल्या… तरी ‘ती’ अपुरीच वाटली – ३६ लाखांच्या हुंड्यासाठी निक्कीला पेटवून दिलं!”
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ ऑगस्ट २०२५

देशातील उत्तर प्रदेश राज्यातील ग्रेटर नोएडातील सिरसा गावात लग्नानंतर आठ वर्ष हुंड्यासाठी छळ करून अखेर एका २६ वर्षीय विवाहितेची तिच्या पतीने आणि सासरच्यांनी मिळून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेला जिवंत जाळण्यात आले. गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत काही तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांनी तिचा पती विपिन याला अटक केली आहे, तर सासू, सासरे आणि दीर अद्याप फरार आहेत. अतिरिक्त पोलीस उपायुक्त सुधीर कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, निक्की असे मृत महिलेचे नाव आहे. २१ ऑगस्टला तिला गंभीर भाजलेल्या अवस्थेत फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात येत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. निक्कीची बहीण कांचन हिने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१६ मध्ये निक्की आणि तिची बहीण कांचन या दोघींचे लग्न दोन भावांशी झाले होते. कांचनचे लग्न रोहितशी, तर निक्कीचे लग्न विपिनशी झाले होते. कांचनने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या वेळी तिच्या कुटुंबीयांनी एक स्कॉर्पिओ गाडी आणि इतर मौल्यवान वस्तू दिल्या होत्या. तरीही सासरचे लोक ३६ लाख रुपयांची मागणी करत होते. नंतर आणखी एक गाडी देण्यात आली, पण पैशांची मागणी आणि छळ थांबला नाही. कांचनने सांगितले, “ते निक्कीला रोज मारहाण करून तिचा छळ करत होते. मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी मलाही मारहाण करायचे.

कांचनने पुढे सांगितले की, निक्कीचा पती विपिन हा बेरोजगार होता आणि त्याला दारूचे व्यसन होते. तो अनेकदा निक्कीला मारहाण करायचा आणि त्याचे आई-वडील त्याचीच बाजू घ्यायचे. त्यांच्यातील वाद अनेकदा स्थानिक पंचायतीसमोर मांडण्यात आले होते, परंतु छळ थांबला नाही. २१ ऑगस्ट रोजी विपिनने दोन्ही बहिणींना मारहाण केली. त्यानंतर त्याने निक्कीच्या मानेवर जोरदार प्रहार केला, ज्यामुळे ती खाली कोसळली. “यानंतर त्याने तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला पेटवून दिले,” असा गंभीर आरोप कांचनने केला आहे. छळाचे काही व्हिडिओही पोलिसांच्या हाती लागले असून, त्यात पती आणि सासू निक्कीला मारहाण करत आणि फरफटत नेत असल्याचे दिसत आहे.

घटनेनंतर शेजारी आणि बहिणीने निक्कीला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु गंभीररित्या भाजल्यामुळे तिचा जीव वाचू शकला नाही. रुग्णालयाकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी पती विपिन, त्याचा भाऊ रोहित आणि त्यांचे आई-वडील दया आणि सतवीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतर आरोपी फरार असून, त्यांना अटक करण्यासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत, असे अतिरिक्त डीसीपी कुमार यांनी सांगितले.

Related Posts

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
जळगाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट
राज्य

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026
वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !
क्राईम

वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !

March 7, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उपचार सुरू असताना अनोळखी ४६ वर्षीय रुग्णाचा मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू

March 7, 2026
‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !
क्राईम

‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

March 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group