• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सुनील महाजनांनी मारली बाजी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 29, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सुनील महाजनांनी मारली बाजी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२५

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवत आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. शनिवारी झालेल्या विशेष सभेत महाजन यांनी १५ विरुद्ध २ मतांनी बाजी मारली. त्यांच्या विरोधात शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ ‘लकी टेलर’ यांना फक्त दोन मतांवर समाधान मानावे लागले.

गेल्या काही दिवसांपूर्वी बाजार समितीचे माजी सभापती श्यामकांत सोनवणे यांच्या विरोधात १८ पैकी १४ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करत समितीतील राजकीय समीकरणे ढवळून काढली होती. मात्र, प्रस्तावावर चर्चा होण्याआधीच सोनवणे यांनी आपला राजीनामा दिला. त्यानंतर रिक्त झालेल्या सभापतीपदासाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.

सभापतीपदाच्या निवडणुकीत सुरुवातीला सुनील महाजन, मनोज दयाराम चौधरी आणि लक्ष्मण पाटील अशी तिरंगी लढत अपेक्षित होती. मात्र मतदानाआधीच मनोज चौधरी यांनी माघार घेतली आणि सामना थेट महाजन विरुद्ध पाटील असा रंगला. मतदानात महाजन यांना तब्बल १५ मते मिळाली, तर पाटील यांना केवळ २ मते मिळाली.

दरम्यान, उपसभापतीपदासाठी गोकुळ चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निकाल जाहीर होताच महाजन यांच्या समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीसह जल्लोष केला. दुसरीकडे, पराभवामुळे ‘लकी टेलर’ म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मण पाटील यांना पुन्हा एकदा सभापतीपद गमवावे लागल्याची हुलकावणी मिळाली. या निवडणुकीतून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्तेचे समीकरण पुन्हा एकदा बदलले असून, पुढील काळात महाजन यांच्या नेतृत्वाखाली समितीची धुरा कशी राबवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group