जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२५
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका क्रीडा संकुल येथे झालेल्या शिरपूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ सादर करत एस.आर.बी. इंटरनॅशनल स्कूल दहिवद चा 17 वर्षे आतील मुलींचा कबड्डी संघ प्रथम क्रमांक पटकावून विजयी ठरला. या विजयानंतर संघाची निवड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी झाली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर, चेअरमन डॉ. धीरज बाविस्कर, संचालिका सौ. मानसी बाविस्कर, प्राचार्य सुभाषनाथ पटले, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. निवेदिता दुबे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद क्रीडाविभाग यांनी संघाचे अभिनंदन करत विजयी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या असून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.