
जळगाव मिरर / २८ सप्तेबर २०२५
जळगाव शहरानजिक असलेल्या एका फार्म हाऊसवर पोलिसांनी भर दुपारी धाड केली असता. या ठिकाणी ऑनलाइन फ्रॉड सुरू असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात चार तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरानजीक असलेल्या ममुराबाद रोडवर असलेल्या फार्म हाऊसवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुपारी एक वाजेच्या सुमारास कारवाई केली असता या ठिकाणाहून ऑनलाइन ट्रेडिंग करणाऱ्या चार तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासोबत असलेला काही मुद्देमाल देखील दुपारी चार वाजेच्या सुमारास ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात चार संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी ताब्यात घेतली असून पुढील कारवाई सुरू आहे.




















