
जळगाव मिरर । २४ नोव्हेंबर २०२५
अडावदकडून यावल रस्त्यावर जाणाऱ्या दुचाकीला भरधाव वेगात चालविणाऱ्या चालकाने ट्रॅक्टरची धडक दुचाकीला दिली. या अपघातात दुचाकीस्वार चालकाचा मृत्यू झाला. गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना धानोरा गावाजवळ महावितरण कार्यालयासमोर रस्त्यावर घडली. शकील सलाउद्दीन तडवी (रा. आडगाव, ता. यावल) असे मयताचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की , शकील हे दुचाकी (एमएच १९ डीपी ९६९१) ने अडावदकडून यावल रस्त्याने आडगाव (ता. यावल) येथे जात होते. धानोरा गावाजवळून दुचाकी जात असताना ट्रॅक्टर (यूपी ७९ एसी ८३२२) चालक भरधाव वेगाने धानोरा गावातील एमएसईबी कार्यालयासमोरील गेट जवळुन बाहेर निघताना समोरुन दुचाकीला जोराने धडक दिली. दुचाकीस्वार शकील तडवी रस्त्यावर पडल्याने डोक्याला गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू झाला. ही वार्ता कळाल्यानंतर कुटुंबियांना जबर धक्का बसला. अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आडगाव येथील सुपडु वासुदेव पाटील यांच्या तक्रारीनुसार ट्रॅक्टरचालक छोटुसिंग याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.




















