जळगाव मिरर | २८ नोव्हेंबर २०२५
आज दिनांक २८/११/२०२५ शुक्रवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाकार्यलय येथे क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले
एकोणीसाव्या शतकातील सामाजिक उतरंडीला धर्मातील अनिष्ट प्रथांनी जखडलं होतं. त्यावेळी जोतिबांनी आपल्या जहाल धोरणाला मुरड न घालता ‘सत्यशोधक समाज’ स्थापन केला. अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत सत्याशी एकनिष्ठता ठेवणारे, आधुनिक भारताचे पहिले समाज क्रांतिकारक महात्मा जोतिबा फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी महानगर जिल्हा अध्यक्ष ईजाजभाई मलिक , जिल्हा सरचिटणीस वाय एस महाजन , महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ मंगलाताई पाटील , माजी अध्यक्ष अशोक लाडवंजारी , उत्तर महाराष्ट्र सामाजिक न्याय रमेशजी सारे , जिल्हा सरचिटणीस सुनिल भैय्या माळी , युवक महानगर जिल्हा अध्यक्ष रिंकू चौधरी , राष्ट्रवादी शहर संघटक राजुभाऊ मोरे , पाचोरा शहर अध्यक्ष नितीनभाऊ तावडे महानगर सरचिटणीस रहिमभाऊ तडवी , संजय जाधव , नयन गाजरे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते




















