
जळगाव मिरर | २८ नोव्हेंबर २०२५
लेवा पाटीदार समाजातील विवाहयोग्य तरुण-तरुणींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी मदत व्हावी, तसेच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने काम करणाऱ्या लेवा नवयुवक संघातर्फे यंदाही भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार, 30 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुल मैदानावर होणार आहे.
या परिचय संमेलनासाठी संघाने नियोजनबद्ध तयारी केली असून उपस्थितांना विवाहयोग्य वधू-वरांची अद्ययावत सूची उपलब्ध करून दिली जाणार आहे. समाज बांधवांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी भोजन व अल्पोपाहाराची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे.
समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लेवा नवयुवक संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी यांनी केले आहे.




















