• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राज्यातील निवडणूक प्रक्रियेत मोठा फेरबदल : जिल्हा परिषद पुढे, महानगरपालिका आधी?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 3, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
राज्यातील निवडणूक प्रक्रियेत मोठा फेरबदल : जिल्हा परिषद पुढे, महानगरपालिका आधी?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ डिसेंबर २०२५ 

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकत्र आणि एकाच दिवशी जाहीर करण्याचा आदेश निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे हे निकाल आता 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत.

मंगळवारी मतदान पार पडले होते आणि निकाल आज जाहीर होणार होते. मात्र, काही ठिकाणी मतदान पुढे ढकलल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे न्यायालयाने हस्तक्षेप केला. या आदेशामुळे 20 डिसेंबरपर्यंत राज्यात आचारसंहिता लागू राहणार असून एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास मनाई आहे.

आयोगाने यापूर्वी तीन टप्प्यांत निवडणुका घेण्याचे नियोजन केले होते. नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका पहिल्या टप्प्यात, जिल्हा परिषद निवडणुका दुसऱ्या आणि महानगरपालिका निवडणुका तिसऱ्या टप्प्यात घेण्याची योजना होती. पण न्यायालयाच्या आदेशामुळे निकाल जाहीर करण्याच्या तारखेत बदल झाल्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांतील कार्यक्रमात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

राज्यातील 20 जिल्हा परिषदा आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यामुळे अडचणीत आहेत. तर 29 महानगरपालिकांपैकी फक्त नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिका आरक्षण घोळात अडकल्या असून उर्वरित 27 महानगरपालिका निवडणुका तातडीने घेता येऊ शकतात. त्यामुळे जिल्हा परिषदा आधी महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकांसाठी तयारी सुरू केली असून, 15 ते 20 डिसेंबरदरम्यान राज्यातील 29 महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, अशी चर्चा आहे. गुरुवारी आयोगाने महानगरपालिका आयुक्तांची बैठक बोलावली असून, मतदार याद्या, तांत्रिक आणि प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरला एकत्र जाहीर झाल्यानंतर ताबडतोब महानगरपालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता अधिक आहे. जिल्हा परिषद निवडणुका मात्र आरक्षणाच्या कारणाने अद्याप अनिश्चित आहेत.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !
जळगाव

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026
जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !
क्राईम

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group