
जळगाव मिरर | ८ डिसेंबर २०२५
तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज शहरात भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग, दणदणीत घोषणाबाजी आणि शिस्तबद्ध मिरवणुकीमुळे रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधले.
तरुण कुढापा चौक, नेरी नाका येथून रॅलीला सुरुवात झाली. पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्य चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चित्रा चौक, एस.टी. वर्कशॉप मार्गे होत संताजी जगनाडे महाराज बगीचा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. सामाजिक बांधिलकी आणि समाज एकतेचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
या प्रसंगी शारदा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत सुरळकर, महिला जिल्हाध्यक्ष निर्मला चौधरी, महानगराध्यक्ष मनीषा चौधरी, बेबाबाई सुरळकर, डॉ. सुषमा चौधरी, आशा चौधरी, अनिता चौधरी, जयश्री चौधरी, मेघा चौधरी, दिपाली चौधरी, सरिता चौधरी, सिमरन चौधरी, रूपाली चौधरी, तृप्ती चौधरी, प्रिया चौधरी, रंजना चौधरी, मोहिनी चौधरी, भारती चौधरी, कविता चौधरी, शोभा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच बबन चौधरी, रामचंद्र चौधरी, संदिप चौधरी, मनोज चौधरी, उमेश चौधरी, प्रकाश चौधरी, विशाल डिगंबर पाटील, विनोद चौधरी, पांडुरंग चौधरी, योगराज चौधरी, सतिश चौधरी, शिवाजी चौधरी, दिपक चौधरी, कैलास चौधरी, हरेश्र्वर चौधरी, चेतन चौधरी, शिवाजी पाटील, स्वप्नील चौधरी, राहुल चौधरी, पंकज चौधरी, आशिष चौधरी, मंगेश चौधरी, मयुर चौधरी, प्रदिप चौधरी, बापु चौधरी, शरद चौधरी, राजेंद्र चौधरी, गोरख चौधरी, निखिल चौधरी, रविंद्र तायडे, सुभाष चिंधू चौधरी, सुभाष महारु चौधरी, मयुर ठाकरे, विलास चौधरी, दिलीप चौधरी, मनोज बापु चौधरी, दुर्गेश चौधरी, भिकन चौधरी, धनंजय चौधरी, विनय चौधरी, अविनाश चौधरी, भरत चौधरी, प्रमोद चौधरी, सचिन चौधरी, कन्हैया चौधरी, हेमंत पाटील, मनोज आप्पा चौधरी, बाळू भाऊ चौधरी, दपाडू चौधरी, प्रसाद चौधरी, प्रकाश ओंकार चौधरी, विजय चौधरी, अँड. चंद्रकांत चौधरी, तुषार पाटील, विक्की चौधरी, संजय चौधरी, प्रकाश चौधरी, हरीश तेली, लक्ष्मण चौधरी, गणेश चौधरी, भूषण चौधरी, हर्षल चौधरी, रोहित चौधरी, निलेश चौधरी, रत्नाकर चौधरी आदींसह समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संताजी महाराजांच्या कार्याचा गौरव, समाजातील ऐक्य आणि सामाजिक सहभागाची भावना यामुळे ही रॅली यशस्वी ठरली.




















