
जळगाव मिरर | २७ जानेवारी २०२६
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन कंजरभाट समाज समाजमंदिर येथे मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. नथ्थु रायचंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी उपस्थितांनी तिरंग्याला मानवंदना देत “भारत माता की जय” व “वंदे मातरम्” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमास समाजाचे उपाध्यक्ष बिरजू नेतलेकर, विजय दहियेकर, राकेश तमायचे, मोहन चव्हाण, फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रदीप नेतलेकर, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, सचिव राहुल नेतलेकर यांच्यासह नरेश बागडे, विजय अभंगे, उमेश माछरेकर, संदीप गारुंगे, वीर दहियेकर, संदीप बागडे, गणेश बागडे, सुमित माछरे, गोपाल बाटूंगे, विनोद माछरेकर, राज नेतलेकर, पंकज नेतलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रतिभा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एस. बाविस्कर सर, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यपिका नंदा पाटील मॅडम तसेच संजयसिंग पाटील विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश भाट, गोविंदा रायचंदे, जितू नेतले, अंकुश माछरे, नितीन बागडे, गौरव रायचंदे, घनश्याम बागडे, अनुराग रायचंदे, प्रितेश बागडे, आयन बागडे, मोनू रायचंदे तसेच महिला भगिनी यशोदा गागडे, संगीता रायचंदे, रोहिणी गुमाने यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी उपस्थितांनी देशाची एकता, संविधान व लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश बागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश माछरेकर यांनी मानले.





















