जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२६
राजस्थान येथून पार्सल आल्याचे सांगत मामा-भाच्याचे अपहरण करीत त्यांना अकोला येथे घेवून जात टांबून ठेवले. त्यानंतर भाच्याला ओलीस ठेवत मामाला २० लाखांच्या खंडणीसाठी सोडून दिले. मामा जळगावात आल्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत एलसीबी आणि शनिपेठ पोलिसांनी तपासचक्रे फिरवित्त अपहरण कर्त्यांचा कट उधळून लावित त्यांचा मुसक्या आवळल्या, अपहरण झालेल्या तरुणाची सुटका केली. ही धक्कादायक घटना रविवार दि. १५ रोजी रात्री घडली. अपहरण करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल साहित्य विक्रीचे दुकान असलेले कृष्णकुमार डुगराराम चौधरी (वय ३२, रा. योगेश्वर नगर) व त्यांचा भाचा गणपतलाल घेवाराम माली (वय १९) हे दि. १५ १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी घरी जात होते. यावेळी त्यांना यश जितेंद्र माकोडे याने कॉल करीत तुमचे राजस्थान येथून पार्सल आल्याचे सांगून भाचा गणपतलाल वाला ममुराबाद रस्त्यावरील एका दुमजली इमारतीत घेऊन गेला त्यानंतर मामा कृष्णकुमार यांना देखील त्याठिकाणी नेले. मामाला इमारतीमध्ये आणल्यानंतर दोघांनी गणपतलाल माली याला बांधून ठेवले होते तर चाकूचा धाक दाखवून त्यांनी त्याचा मामा कृष्णकुमार चौधरी याला देखील बसवून ठेवले होते.
अपहरण कल्यांनी तू मला मारण्याची सुपारी दिली असल्याने तुला येथे घेऊन आल्याचे यशने सांगितले मात्र खरे खोटे करण्यास तयार असल्याचे कृष्णकुमार याने सांगितले. त्यानंतर त्यांना दुचाकीवर बसवून यश हा गोलाणी मार्केटकडे आला आणि तेथून चहा विक्री करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला मागे बसवून भुसावळच्या दिशेने निघाला. काही अंतरावरून अल्पवयीन मुलाला ममुराबाद रस्त्यावरील खोलीत डांबून ठेवलेल्या गणपतलाल घेऊन येण्यासाठी पाठविले. त्यानंतर अपहरण कर्त्यांनी पोघांनाही दुचाकीने अकोला येथे नेले.
२० लाख रुपयासाती भाच्याला ओलीस ठेवल्यामुळे मामा कृष्णकुमार है पैसे घेण्यासाठी जळगावाला येण्याकरीता निघाले. जळगावात पोहचताच त्यांनी शनिपेठ पोलीस गाठले आणि पोलिसांसमोर आपबिती कथन केली. शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी घटनेचे प्रसंगावधान राखत तात्काळ तपासचक्रे फिरविण्यास सुरुवात केली.
पोलिसांच्या पथकांकडून तांत्रिक माहितीच्या आधारे अपहरणकल्यां यश माकोडे यांचा शोध घेतला. त्यानंतर अकोला पोलिसांच्या मदतीने त्यांनी ओलीस ठेवलेल्या गणपतलाल घेवाराम माली या तरुणाची सुखरुप सुटका केली तर अपहरण कणाऱ्या यश माकोडे आणि त्याच्या साथीदार असलेल्या अल्पवयीन मुलाच्या मुसक्या आवळल्या पोलिसानी त्या दोघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी पैशांसाठी अपहरण केल्याची कबुली दिली. दोघांना जळगावात आणल्यानंतर शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.




















