जळगाव मिरर | १८ फेब्रुवारी २०२६
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि त्यांच्या धडाकेबाज नेतृत्वावर विश्वास ठेवून, आज पोलीस कॉलनी आणि सुप्रीम कॉलनी परिसरात मनसेच्या नवीन शाखेचे अत्यंत जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, परिसरातील ५० हून अधिक मुस्लिम तरुणांनी इतर पक्षांना सोडचिठ्ठी देत अधिकृतपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साही वातावरणात झाली. ढोल-ताशांच्या कडकडाटात आणि “राजसाहेब ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. स्थानिक तरुणांचा हा उत्साह पाहून आगामी काळात जळगाव शहरात मनसेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या प्रसंगीजिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे,उप महानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उप महानगर अध्यक्ष,ललित शर्मा. विभाग अध्यक्ष उमेश आठरे.दीपक राठोड उपस्थित होते. पोलीस कॉलनी परिसर शाखाध्यक्षपदी युसुफ खाटीक यांची नियुक्ती करण्यात आली. थ्री इडियट फेम जहांगीर पेंटर या वेळी उपस्थित होते.
पक्षात प्रवेश केलेल्या तरुणांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, राजसाहेबांची स्पष्ट भूमिका आणि विकासाची दृष्टी आम्हाला भावली आहे. जाती-पातीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारा हा एकमेव नेता आहे, म्हणून आम्ही आज मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी यावेळी नवनियुक्त कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि पोलीस कॉलनी, सुप्रीम कॉलनी भागात जनसेवेचे व्रत सुरू ठेवण्याचे आवाहन केले. या शाखा उद्घाटनामुळे परिसरात मनसेचे संघटन अधिक मजबूत झाले आहे.
प्रवेश केलेल्यांची नावे खालील प्रमाणे..
.युसुफ जाकीर खाटीक. शाखा अध्यक्ष. बादशाह शाखा उपाध्यक्ष. अशपाक. शहा सचिव. अभिषेक बेंगळे. जहांगीर पेंटर. अली आरिफ खाटीक दीपक चौधरी.वअफजल इसाका खाटीक. इमरान शहा. इम्रान पिंजारी. साहिल सलीम पिंजारी. तौसीब शब्बीर. समीर पिंजारी. स्माईल पटेल.राजू भाई. सोबत असंख्य मुस्लिम तरुण उपस्थित होते.




















