जळगाव मिरर | २१ फेब्रुवारी २०२६
वरणगाव येथील भोईवाडा परिसरात सह्याद्री मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य महाआरती उत्साहात पार पडली. देशभक्तीपर घोषणांनी आणि ‘शिवगर्जना’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमामुळे परिसरात भक्तीमय आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
महाआरतीपूर्वी शिवप्रतिमेची आकर्षक सजावट करण्यात आली होती. फुलांच्या आरास, दीपप्रज्वलन आणि ढोल-ताशांच्या गजरात छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. उपस्थितांनी एकमुखाने “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणा देत शिवचरित्राच्या स्मृतींना उजाळा दिला.
या उपक्रमात पै. श्रीराम भोई, अजय भोई, भूषण सोनवणे, विशाल भोई, महेश सोनवणे, सोमनाथ भोई, रक्षक भोई, संदीप भोई आणि सागर मराठे, मनोज धनगर आदी कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन सुयोग्यरीत्या पार पाडले. कार्यक्रमाला भोईवाडा परिसरातील नागरिक, युवक आणि ज्येष्ठांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. सामाजिक एकोपा आणि राष्ट्रप्रेम जागविणाऱ्या अशा उपक्रमांचे आयोजन पुढेही करण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले. महाआरतीनंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला.




















