• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 8, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मीरर | ८ मार्च २०२६ 

नवापूर तालुक्यातील खांडबारा रेल्वे स्थानकावर एका माथेफिरू तरुणाने रेल्वेच्या डब्यावर चढून हायव्होल्टेज ओव्हरहेड वीजतारांजवळ धिंगाणा घातल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकारामुळे स्थानकावर उपस्थित प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही काळ रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे १० ते १०.३० वाजेच्या सुमारास भुसावळ–सुरत रेल्वे मार्गावरील खांडबारा स्थानकात ही घटना घडली. स्थानकावर उभ्या असलेल्या एका प्रवासी रेल्वेच्या डब्यावर एक तरुण अचानक चढला. डब्यावर चढल्यानंतर त्याने तिथे इकडून तिकडे धावाधाव करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, रेल्वेला वीजपुरवठा करणाऱ्या सुमारे २५ हजार व्होल्टच्या जिवंत ओव्हरहेड तारांच्या अगदी जवळून हा तरुण फिरत होता. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. हा प्रकार लक्षात येताच स्थानकावरील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच स्टेशन मास्तर आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्या मार्गावरील विद्युत पुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला खाली उतरवण्यासाठी वारंवार विनंती केली. मात्र तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर रेल्वे कर्मचाऱ्यांनी जवळपास अर्धा ते एक तास त्याची समजूत काढल्यानंतर त्याला खाली उतरवण्यात यश आले. तोपर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ झाली होती. या प्रकारामुळे काही काळ रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, रेल्वेच्या जिवंत वीजतारांच्या इतक्या जवळ जाणे अत्यंत धोकादायक असते. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे परिसरात अशा प्रकारचे धोकादायक कृत्य करू नये व सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. घटनेनंतर रेल्वे सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांनी संबंधित तरुणाची चौकशी सुरू केली आहे. तो नेमका कोण आहे आणि त्याने हा प्रकार का केला, याचा तपास सुरू आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात खळबळ : एकाच दिवशी दोन तरुणांनी संपविले आयुष्य !

August 26, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

संतापजनक : २७ वर्षीय महिलेशी गोड बोलून अत्याचार : संशयित अटकेत !

August 26, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत तीन घरांमध्ये घरफोडी

August 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शिरसोलीतील २५ वर्षीय तरुण धरणात बुडाला !

August 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकी, मोबाईल अन् घड्याळ धरणाकाठी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला धरणात !

August 25, 2026
शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
क्राईम

शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

August 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावात खळबळ : एकाच दिवशी दोन तरुणांनी संपविले आयुष्य !

August 26, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

संतापजनक : २७ वर्षीय महिलेशी गोड बोलून अत्याचार : संशयित अटकेत !

August 26, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत तीन घरांमध्ये घरफोडी

August 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शिरसोलीतील २५ वर्षीय तरुण धरणात बुडाला !

August 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group