
नाशिक : वृत्तसंस्था
सध्या उत्तर महाराष्ट्रात पाउस कमी अधिक प्रमाणात सुरू आहे याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आपल्या शहरातून जवळ असलेल्या ठिकाणी शनिवार रविवार सुटीचा आनंद घेण्यासाठी जात असतात. पर्यटन करण्यासाठी गेलेल्या एका २० वर्षीय युवक चक्कर येवून खाली पडल्याने मृत्यूच झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये २९ रोजी रात्री घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, नाशिक मधील सिडको परिसरातील शिवपुरी चौकात राहणार अजय सरोवर (वय २०) हा पेठ रस्त्यावर असलेले रामशेज किल्ल्यावर हा आपल्या परिवारासोबत शनिवारी फिरायला गेला होता.
रामशेज किल्ला हा उंचीवरचा अंदाज न घेता मार्गक्रमण करीत होता. यावेळी त्याला चक्कर आल्याने तो खाली कोसळला. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामुळे घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. मयत अजयच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.





















