
जळगाव मिरर | ४ मे २०२६
शहरातील एका परिसरातील सासरच्या मंडळींनी वेगवेगळ्या कारणांनी विवाहितेचा छळ करण्यासह दिराने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २४ एप्रिल रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात घडली. या प्रकरणी २ मे रोजी दिरासह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरातील २९ वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळींनी वेळोवेळी शिवीगाळ करीत मारहाण केली. सततच्या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून गेली. त्यानंतर, २४ एप्रिल रोजी दिराने या विवाहितेचा विनयभंग केला. तपास पोहेकॉ. शरद वंजारी करीत आहेत.




















