• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 11, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ मे २०२६

शहरातील रोझलँड  इंग्र्लीश मिडीयम स्कूलमध्ये रविवार, दि. १० मे २०२६ रोजी सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. “प्रा. श्री. आर. डी. वायकोळे यांच्या स्मृतीस कृतज्ञता आणि प्रेरणेने समर्पित” या भावनेतून उभारण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन श्री. संतोष प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. मिलिंद वायकोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सदर सौर ऊर्जा प्रकल्प हा सॅनरोझ फाउंडेशन आणि डॉ. मिलिंद वायकोळे यांच्या संयुक्त पुढाकारातून साकारण्यात आला असून विद्यालयाच्या अध्यक्षा सौ. रोजमिन खिमानी प्रधान यांच्या संकल्पनेतून या प्रकल्पाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमात सौर ऊर्जा ही काळाची गरज असल्याचे सांगत पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

प्रा. आर. डी. वायकोळे हे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी अनेक वर्षे रोझलँड शाळेला मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले होते. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते त्यांना “आदर्श शिक्षक” पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. विद्यार्थ्यांप्रती असलेला जिव्हाळा, उत्कृष्ट अध्यापनशैली आणि शैक्षणिक बांधिलकी यामुळे ते आजही विद्यार्थ्यांच्या स्मरणात आहेत. ते शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले होते. तसेच जळगावमधील पहिले आरसीसी सल्लागार म्हणूनही त्यांची ओळख होती. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांचे मार्गदर्शन व देखरेख करण्याचे कार्यही त्यांनी केले होते. त्यांच्या प्रेरणेतूनच हा सौर ऊर्जा प्रकल्प साकारण्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या निमित्ताने नुकत्याच जाहीर झालेल्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थिनी अफिफा खान हिने ९०.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सोहम पाटील याने ८४.६० टक्के गुणांसह द्वितीय, तर सायमीन सैय्यद हिने ८४.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान डॉ. मिलिंद वायकोळे आणि डॉ. सतीश दलिचंद ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोजुद्दीन शेख, सौ. मनीषा बंब, श्री. संतोष प्रधान, वाय. एस. पाटील उपस्थित होते. तसेच रोझलँड मराठी माध्यमाचे प्राचार्य श्री. घोलाने सर, रोझलँड इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या सौ. सीता तिवारी, नावेद निजामी सर, श्री. प्रवीण भोळे, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात
जळगाव

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!
जळगाव

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group