• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 12, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ मे २०२६ 

रस्त्याच्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी पाच लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता योगेश अहिरे याच्याबाबत चौकशीत नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) तपासात अहिरे याने दोन वेळा दुबईसह बँकॉक दौरे केल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यांमागील आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मनपा प्रभाग क्रमांक १४ मधील विनोबा नगर परिसरातील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे थकीत बिल मंजूर करण्यासाठी योगेश अहिरे याने तब्बल १५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यातील साडेसात लाख रुपये स्वतःसाठी, तर उर्वरित रक्कम वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी असल्याचे सांगण्यात आले होते. या लाचेतील पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने अहिरे याला रंगेहाथ अटक केली होती.

सध्या अहिरे पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. सोमवारी एसीबीच्या पथकाने त्याच्या कार्यालयासह निवासस्थानी झाडाझडती घेतली. मात्र या कारवाईत कोणतीही संशयास्पद कागदपत्रे किंवा मोठी मालमत्ता आढळून आली नाही. तरीही भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अपसंपदा जमविल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्याच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, या व्यवहारात नगरसेविका पुत्र ‘पाटील’ आडनावाच्या एका व्यक्तीला सहा टक्के रक्कम देण्याचेही सांगण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. संबंधित व्यक्ती अद्याप चौकशीसाठी हजर झाली नसून एसीबीने त्यालाही चौकशीच्या रडारवर ठेवले आहे.

या प्रकरणात अहिरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने लाच मागितल्याचा मुद्दाही पुढे आला आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली असून त्यांनी आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तक्रारदाराच्या कामाची बिले अहिरे यांनी तयार केली होती, मात्र ती पुढील मंजुरीसाठी सादरच करण्यात आली नव्हती. त्यामुळे संबंधित फाईल वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचे त्यांनी जबाबात नमूद केले आहे.  एसीबीकडून आता अहिरे यांच्या मालमत्ता, परदेश दौरे आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Posts

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !
क्राईम

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026
प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !
जळगाव

प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !

May 11, 2026
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !
जळगाव

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group