• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अमळनेरात उष्माघाताचा कहर : बसस्थानकात कोसळून ज्येष्ठ पूजाऱ्याचा मृत्यू; दोन दिवसांत पाचवा बळी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 14, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अमळनेरात उष्माघाताचा कहर : बसस्थानकात कोसळून ज्येष्ठ पूजाऱ्याचा मृत्यू; दोन दिवसांत पाचवा बळी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ मे २०२६ 

अमळनेर तालुक्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून मंगळवारी (दि. १३) दुपारी अमळनेर बस स्थानक परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बहादरपूर येथील बद्रीनाथ मंदिराचे पूजारी श्रीहरी प्रभाकर दीक्षित (वय ७८) असे मृत ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. गेल्या दोन दिवसांत अमळनेर तालुक्यात उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची ही पाचवी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  श्रीहरी दीक्षित हे अमळनेर शहरात धार्मिक विधी कार्यक्रम आटोपून आपल्या गावी परतण्यासाठी दुपारच्या सुमारास बस स्थानकात आले होते. त्यावेळी परिसरात प्रचंड उष्णता असून तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. उन्हाचा तडाखा आणि वाढत्या उकाड्यामुळे त्यांना अचानक चक्कर आली आणि ते बस स्थानक परिसरातच कोसळले.

घटनेच्या वेळी कर्तव्यावर असलेले ट्रॅफिक पोलीस कर्मचारी संजय बोरसे, विनय पाटील आणि रवींद्र बोरसे यांनी तत्काळ धाव घेत त्यांना मदत केली. पोलिसांनी वेळ न दवडता श्रीहरी दीक्षित यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक वैद्यकीय अंदाजानुसार उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेमुळे अमळनेर शहरासह परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून नागरिक अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना या तीव्र उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. भरपूर पाणी पिणे, दुपारच्या कडक उन्हात बाहेर न पडणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे तसेच शरीरात पाण्याची कमतरता होऊ न देणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related Posts

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !
जळगाव

असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group