
जळगाव मिरर | ११ जून २०२६

यावल शहरातील देशमुख वाडा भागातील रहिवासी ६५ वर्षीय वृद्धाने आजाराला कंटाळून अंजाळे गावाजवळील मोर नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरातील देशमुख वाडा भागातील लहान मारुती मंदिराजवळील रहिवासी वसंत अर्जुन माळी (वय ६५) हे वृद्ध दीर्घ आजाराला कंटाळले होते. दरम्यान. आजाराला कंटाळन ते मंगळवारी सायंकाळी घराबाहेर निघून गेले होते. कुटुंबीयांकडून त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र, ते कुठेच मिळाले नाहीत. दरम्यान, अंजाळे गावाजवळील मोर नदीच्या पात्रात एका वृद्धाने पाण्यात उडी घेतल्याची माहिती नागरिकांकडून कुटुंबीयांना मिळाली.
त्यामुळे माळी यांचे कुटुंबीय तातडीने तेथे दाखल झाले. त्यानंतर नदीपात्रातून मृतदेह काढून यावळ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी गोलू माळी यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत वसंत माळी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ मुली, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते रवींद्र माळी यांचे वडील तर किशोर उर्फ गोलू माळी व राहुल माळी यांचे मोठे काका होत.




















