• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पावसाची प्रतीक्षा, कर्जाची चिंता अन् शेतकाऱ्याने घेतला जीवनयात्रेचा शेवट !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 16, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पावसाची प्रतीक्षा, कर्जाची चिंता अन् शेतकाऱ्याने घेतला जीवनयात्रेचा शेवट !
Share on FacebookShare on Twitter

जगळव मिरर | १६ जून २०२६ 

चोपडा तालुक्यातील अडावड येथील  गतवर्षीच्या हंगामात अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या आणि यंदाच्या हंगामाकडून मोठ्या आशा बाळगलेल्या अडावद येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने पावसाच्या विलंबामुळे वाढलेल्या चिंतेतून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी पहाटे घडली. गोविंदा चैत्राम गंभीर (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अडावद येथील वरच्या माळी वाड्यात राहणारे गोविंदा गंभीर हे सुमारे पाच एकर कोरडवाहू शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गतवर्षी त्यांनी मक्याचे पीक घेतले होते. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नव्हते. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या होत्या.

यंदाच्या हंगामात चांगले उत्पादन घेऊन मागील नुकसान भरून काढण्याचा निर्धार त्यांनी केला होता. त्यासाठी कर्ज काढून शेताची पूर्वतयारीही पूर्ण केली होती. मात्र, मान्सूनचे आगमन लांबल्याने पेरणी खोळंबली. वाढते कर्ज, देणी कशी फेडायची, आगामी हंगामाचे उत्पन्न कसे येईल आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या चिंतेने ते सतत ग्रासले होते.  या विवंचनेतून त्यांनी १५ जून रोजी पहाटे सुमारे पावणे दोन वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा मृत्यू झाला.

मृत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, मृतदेहाचे शवविच्छेदन चोपडा उपजिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी करण्यात आले. त्यानंतर दुपारी अडावद येथे नातेवाईक, ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  या घटनेची चोपडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?
जळगाव

पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

‘पत्ता सांगा’ म्हणत वृद्धेला गाठले; क्षणार्धात दीड लाखांची सोनपोत लंपास !

June 16, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी कट्ट्यासह दुचाकीस्वार जेरबंद; चोपडा पोलिसांची धडक कारवाई !

June 16, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

सहकार विभागातील भ्रष्टाचार उघड; अधिकारी व दोन लेखापरीक्षकांवर जळगाव एसीबीची कारवाई !

June 16, 2026
महाकाय उघडा नाला बनला जीवघेणा धोका; उपमहापौरांची अधिकाऱ्यांना दोन दिवसांची तंबी
जळगाव

महाकाय उघडा नाला बनला जीवघेणा धोका; उपमहापौरांची अधिकाऱ्यांना दोन दिवसांची तंबी

June 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026
पावसाची प्रतीक्षा, कर्जाची चिंता अन् शेतकाऱ्याने घेतला जीवनयात्रेचा शेवट !

पावसाची प्रतीक्षा, कर्जाची चिंता अन् शेतकाऱ्याने घेतला जीवनयात्रेचा शेवट !

June 16, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

‘पत्ता सांगा’ म्हणत वृद्धेला गाठले; क्षणार्धात दीड लाखांची सोनपोत लंपास !

June 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group