
जळगाव मिरर | २९ जून २०२६

शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील हनुमान नगर येथे तिसऱ्या मजल्यावरील ओल्या असलेल्या जागेवरुन पाय घसरुन पडल्यामुळे दीड वर्षीय हर्षीत रामेश्वर चव्हाण या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवार दुपारच्या सुमारास रामेश्वर कॉलनीत घडली. या घटनेत एकुलत्या एक चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू 7 झाल्याने चव्हाण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हनुमान नगरातील हनुमान नगरात तिसऱ्या मजल्यावर राहणारे रामेश्वर चव्हाण हे पत्नी व दीड वर्षाच्या हर्षीत या चिमुकल्यास वास्तव्यास होते. शहरातील एका खासगी रुग्णालयात काम करुन ते कुटुंबियांचा उदनिर्वाह करतात. शनिवार दि. २७ जून रोजी दुपारच्या सुमारास घरासमोर पाणी सांडलेले असल्याने ती जागा ओली होती. दरम्यान, खेळत असलेल्या दीड वर्षाच्या हर्षीतचा ओल्या जागेवरुन पाय घसरुन तो थेट तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला.
तिसऱ्या मजल्यावरुन दीड वर्षाचा चिमुकला हर्षीत खाली कोसळल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, चिमुकला खाली कोसळल्याचे लक्षात येताच त्याच्या कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्याला गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले. गंभीर अवस्थेत असलेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. हर्षीत हा चव्हाण दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. पोटाच्या गोळ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. तसेच या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.




















