
जळगाव मिरर | २९ जून २०२६

पाच हजार रुपये उसनवार देण्याच्या बहाण्याने बोलवून घेत नाशिक येथील ब्युटीपार्लर चालक महिलेवर कारमध्येच अत्याचार करण्यात आला. ही घटना दि. २४ जून रोजी दुपारी दीड वाजता सागर पार्क परिसरात घडली. या प्रकरणी दि. २७ जून रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात सुनील मधुकर चौधरी (रा. धरणगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार, नाशिक येथील घटस्फोट झालेल्या २८ वर्षीय महिलेची फेब्रुवारी महिन्यात सुनील चौधरी याच्याशी ओळख झाली. त्या वेळी त्याने मी प्रॉपर्टीचे काम करतो, असे सांगून काही काम लागल्यास सांगायचे असे म्हणत त्याचा मोबाईल क्रमांक दिला व महिलेचाही क्रमांक त्याने घेतला होता. गेल्या १५ दिवसांपासून त्याने महिलेला मेसेज करणे सुरू केले. त्या दरम्यान महिलेने त्याला घरभाड्यासाठी ५ हजार रुपये उसनवार मागितले होते. दरम्यान, संशयित सुनिल चौधरी यांनी महिलेला तू जळगावला आल्यावर कॉल कर असे सांगितले. त्यानुसार सदर महिला जळगावात आल्यानंतर दि. २४ रोजी त्याच्याशी संपर्क साधला. त्याने सदर महिलेला सागरपार्कजवळ बोलविले होते.
पीडीत महिला ही सागर पार्क परिसरात आली असता, संशयित एका कारमध्ये बसलेला होता. सदर महिला तेथे गेल्यानंतर तिला कारमध्ये बसवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यास महिलेने नकार दिल्याने तिच्या कानशिलात लगावत त्याने या महिलेवर कारमध्येच अत्याचार केला.
अत्याचार केल्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला पाहून घेईल, अशी धमकी त्याने दिली. घाबरलेल्या महिलेने तीन दिवस तक्रारही दिली नाही. मात्र तिच्या मैत्रिनीने तिला धीर दिला आणि दि. २७ जून रोजी पीडित महिलेने रामानंद पोलीस स्थनाकात फिर्याद दिली.




















