
जळगाव मिरर | २ जुलै २०२६

सातबारा उताऱ्यावरील नोंदणीची दुरुस्तीसाठी भु कर मापक जितेंद्र प्रकाश पाटील (वय ४५, रा. भूषण कॉलनी) तुमचे काम मी साहेबांशी बोलून करुन देईल. परंतू त्याकरीता साहेबांसाठी माझ्याकडे दहा हजार रुपये द्यावे लागतील आणि मला तुमच्या ईच्छेप्रमाणे पैसे देवून टाकला असे म्हणत १५ हजारांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई दि. १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील भूमी अभिलेख कार्यालयात झाली.
तक्रारदार यांचे शहरात वडीलोपार्जित घर असून घराच्या कागदपत्रांमध्ये त्यांच्या काकांनी फेरफार करुन ते घर स्वतःच्या नावे करुन तक्रार दाराच्या गवडीलांचे नाव कमी केले होते. त्यांनी भूमी अभिलेख विभागाचे नो अधीक्षक यांच्याकडे अपील त केले होते. त्या अपीलावर नोंद रद्द होवून तक्रारदार यांचे वडीलोपार्जीत नाव पुन्हा घराच्या सातबारा उताऱ्यावर लावण्याचे नादुरुस्तीचे आदेश झाले आहे. तक्रारदार यांनी दि. २५ डिसेंबर रा २०२५ व दि. ५ जून २०२६ रोजी आदेशाप्रमाणे रद्द झालेली नोंद सातबारा उताऱ्यावर अद्यावत करुन मिळण्याकरीता अर्ज केला होता. परंतू त्या अर्जावर कुठलीही कार्यवाही झालेली नव्हती.
तक्ररदार यांनी दि. २५ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकाडे तक्रार दाखल केली होती. त्याची पडताळणी केली असता, जितेंद्र पाटील यांनी प्रलंबित काम करुन देण्याकरीता त्यांच्यासा साहेबांसाठी दहा हजार व स्वतःसाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी करुन स्विकारण्याची संमती दर्शविली होती. एसीबीच्या पथकाने सापळा रचून भूकरमापक जितेंद्र पाटील यांना १५ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, हेमंत नागरे, उपनिरीक्षक सुरेश पाटील, महिला पोहेकॉ संगिता पवार, राकेश दुसाने, प्रदीप पोळ, मनोज पाटील यांच्या पथकाने केली.
तक्रारदार यांनी दि. १८ जून रोजी संबंधित कार्यालयात जावून कामाबाबत चौकशी केली. यावेळी भूकरमापक जितेंद्र पाटील यांनी त्यांना मी साहेबांशी बोलून करुन देईल, परंतू त्यासाठी तुम्हाला आमचे साहेबांसाठी माझ्याकडे दहा हजार रुपये द्यावे लागतील, तसेच मला तुमचे ईच्छेप्रमाणे पैसे देवून टाकाल असे सांगून दहा हजारांच्या लाचेची मागणी केली होती.



















