
जळगाव मिरर | १ जुलै २०२६

शहरातील एका परिसरातून नात्याला कालिमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. एका घरात झोपलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत तिच्याच जन्मदात्या पित्याकडून वेळोवेळी अश्लिल चाळे करुन अतिप्रसंग केला जात होता. ही बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना दि. २४ जून ते दि. २८ जून दरम्यान घडली. पीडितेच्या आईने विरोध केला असता पीडितेच्या वडीलांनी तिला अश्लिल शिवीगाळ करीत मारहाण केली. दरम्यान, त्यांनी दि. २९ जून रोजी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. दि. २४ जून रोजी पीडिता ही तिच्या कुटुंबियांसोबत घरात झोपलेली असतांना पीडितेच्या नराधम वडील हे तिच्याजवळ गेले. त्यांनी पीडिता झोपेत असतांना तिच्यासोबत अश्लिल वर्तन केले. पीडितेला जाग आल्यामुळे तीने आरडाओरड केल्याने तीची आई तेथे गेली. त्यावेळी संशयिताने पीडितेसह तिच्या आईला मारहाण करीत घरातून निघून गेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा संशयित नराधम बापाने पीडितेला झोपेतून उठावून तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत घरातून निघून गेला होता.
दोन दिवस हा प्रकार सुरु राहील्यानंतर दि. २८ जून रोजी पीडिता ही मध्यरात्री झोपेत असतांना तीचा नराधम बाप हा तिच्यासोबत अतीप्रसंग करण्यासाठी गेला. त्यावेळी पीडितेच्या आईने त्याला काय लावले आहे तुम्ही असे म्हणत विरोध केला. त्यावेळी नराधमाने दोघ मायलेकींना शिवीगाळ करीत तू याबाबत कोणाला काही सांगितले तर तुम्हाला जीयेठार मारून टाकेल अशी धमकी दिली दरम्यान, याबाबत पीडितेच्या आईने दि. २९ जून रोजी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पीडितेच्या नराधम बापाविरुद्ध पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक यांनी संशवित पीडितेच्या बापाला अटक केली, त्याला मंगवार दि ३० जून रोजी न्यायालयात हजर केले असता, त्याला दि. २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास निरीक्षक संजय तडवी हे करीत आहेत.




















