• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात सीलबंद घरात एसीबीची ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 3, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ जुलै २०२६ 

अकोला येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईत अडकलेले मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगावातील सीलबंद घराची गुरुवारी (दि. २ जुलै) एसीबीच्या नाशिक व जळगाव पथकाने संयुक्तपणे ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती सुरू केली. दुपारपासून सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कारवाईदरम्यान पैशांची मोजणी करणारे मशीन तसेच मोठे खोके घटनास्थळी आणण्यात आल्याने पथकाच्या हाती मोठे घबाड लागल्याची चर्चा शहरात रंगली आहे. मात्र, याबाबत एसीबीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार,  अकोला येथे लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून एसीबीने मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर जळगाव शहरातील साईप्रभा आर्केड अपार्टमेंटमधील त्यांच्या निवासस्थानाला एसीबीने सील केले होते. मात्र, त्याच रात्री काही व्यक्तींनी शिडीच्या साहाय्याने सीलबंद घरात प्रवेश करून साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी जिल्हापेठ पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडून अटक केली होती. या घटनेमुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते. या पार्श्वभूमीवर एसीबीने पुन्हा घर सीलबंद करून तेथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. अखेर गुरुवारी नाशिक आणि जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठ ते दहा अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने दुपारी सुमारे चार वाजल्यापासून घराची सखोल तपासणी सुरू केली.

कारवाईदरम्यान कमालीची गोपनीयता पाळण्यात आली. अपार्टमेंटमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आला होता. तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींनाही इमारतीत जाण्यास मज्जाव करण्यात आला. एसीबीचे अधिकारी घरातील कागदपत्रे, मौल्यवान वस्तू आणि इतर साहित्याची बारकाईने तपासणी करत असल्याचे समजते.

सायंकाळच्या सुमारास पैशांची मोजणी करणारे मशीन आणि मोठ्या आकाराचे अनेक खोके अपार्टमेंटमध्ये नेण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे झाडाझडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड, कागदपत्रे किंवा इतर महत्त्वाचे साहित्य हाती लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. तथापि, कारवाई पूर्ण होईपर्यंत एसीबीकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. सीलबंद घरात यापूर्वी घरफोडीचा प्रयत्न झाल्यामुळे यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अपार्टमेंट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत झाडाझडती सुरू असल्याने या कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !
जळगाव ग्रामीण

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group