जळगाव मिरर | ४ जुलै २०२६
यावल शहरातील एका भागात राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस २९ जूनला २४ वर्षीय तरुणाने आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले होते. या मुलीवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील स्वामी विवेकानंद नगरमधील मोहन रघुवंशी याने २९ जूनला अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले होते. प्रारंभी यावल पोलिसांत अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पोलिसांच्या तपासात मोहन रघुवंशी याने या अल्पवयीन मुलीस चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी येथे नेल्याचे उघड झाले. त्यानंतर या तरूणास व अल्पवयीन मुलीस पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित मोहन रघुवंशी याने ही मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अॅट्रासिटीसह पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरूणास शुक्रवारी भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.





















