• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 4, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ जुलै २०२६

जालना-वडीगोद्री महामार्गावरील शहापूरजवळील गल्हाटी नदीच्या पुलावर शनिवारी सकाळी दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ‘मानव विकास मिशन’च्या बसमधून प्रवास करणाऱ्या सुमारे २५ शाळकरी विद्यार्थ्यांसह जवळपास ३० प्रवासी जखमी झाले, तर दोन्ही बसचालक गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व जखमींवर अंबड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. ‘मानव विकास मिशन’ची बस (एमएच-१४ एमएच-१७५०) भांबेरी येथून २५ ते ३० शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन अंबडकडे जात होती. त्याचवेळी अंबडहून बीडकडे जाणारी एसटी बस (एमएच-१४ बीटी-३०२२) समोरून येत होती. शहापूरजवळील गल्हाटी नदीच्या पुलावर पोहोचताच बीडकडे जाणाऱ्या बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाली.

धडकेचा आवाज परिसरात मोठ्या प्रमाणात घुमल्याने स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या आणि घाबरलेल्या विद्यार्थ्यांना तसेच अन्य जखमी प्रवाशांना नागरिकांनी बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने अंबड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दोन्ही चालक गंभीर जखमी झाले आहेत. दुसऱ्या एसटी बसमध्येही १२ ते १५ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून प्राथमिक माहितीनुसार बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  सुदैवाने या भीषण अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नसला, तरी शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा अपघात झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि त्वरित मिळालेल्या वैद्यकीय मदतीमुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याचे बोलले जात आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !
जळगाव ग्रामीण

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group