जळगाव मिरर | ५ जुलै २०२६
शासकीय दिव्यांग बहुउद्देशिय संमिश्र केंद्र जळगाव येथे माजी राज्यमंत्री तथा आमदार श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाच्या पंधरवडा अभियानाची सुरुवात आज दिनांक-04/07/2026 रोजी करण्यात आली.

जनसेवा विचारधारा फांऊडेशन यांच्या वतीने अभियानाची सुरुवात करण्यात आली. सदरचे कार्यक्रमाचे ७ वे वर्षे असून यंदा जळगाव शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपणासह विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आ. मप्रकाश उर्फ बच्चू कडू साहेब यांच्या ५ जूलै रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात आज दिनांक-04/07/2026 रोजी शासकीय दिव्यांग बहुउद्देशिय संमिश्र केंद्र जळगाव शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय येथील मा.डॉ.श्री. उमेश लाड साहेब(उपअधिष्ठाता) यांच्या हस्ते वृक्षारोपण अभियानाची सुरुवात करण्यात आली.
शासकीय दिव्यांग बहुउद्देशिय संमिश्र केंद्र जळगावचे-अधिक्षक-डॉ.श्री. किरण शिरसाठ साहेब,श्री.अक्षय महाजन सर,यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राजेंद्र ठाकूर(कर्मचारी),समाधान राठोड,यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी-अक्षय महाजन सर,जनसेवा विचारधारा फाउंडेशन-अध्यक्ष-निलेश बोरा,गणेश पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे लाभलेले-मा.डॉ.श्री.उमेश लाड सर- उपअधिष्ठाता शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय,जळगाव यांच्या हस्ते वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची सुरवात करण्यात आली. यावेळी- शासकीय दिव्यांग बहुउद्देशीय संमिश्र केंद्राचे विद्यार्थी उपस्थित होते.




















