• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 16, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ जुलै २०२६ 

शहरातील एमआयडीसी परिसरातील एका गोदामावर अन्न व औषध प्रशासन विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल १२ लाख १५ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर वकार शेख जब्बार शेख (वय ३२) व धीरज मिश्रा (दोघे रा. शाहू नगर, जळगाव) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध गुटखा साठा व वितरणाच्या रॅकेटवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाला एमआयडीसी परिसरातील एम-१२४ सेक्टरमधील एका गोदामात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहआयुक्त (अन्न) दिनानाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंके व आकाश बोराडे यांनी संबंधित गोदामावर छापा टाकला.

तपासणीदरम्यान गोदामात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला. कारवाईत प्रत्येकी ७५ पाऊच असलेले ‘गोवा गुटखा’चे ३,३०० पाकिटे तसेच प्रत्येकी २६ पाऊच असलेले १,५०० पाकिटे असा एकूण ४,८०० पाकिटांचा साठा जप्त करण्यात आला. या मालाची अंदाजे किंमत १२ लाख १५ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंके यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार वकार शेख जब्बार शेख व धीरज मिश्रा यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत आहेत.

प्राथमिक चौकशीत संबंधित आरोपींनी हा प्रतिबंधित गुटखा भाडेतत्त्वावर घेतलेल्या गोदामात साठवून ठेवल्याचे समोर आले आहे. या अवैध साठ्यामध्ये गोदाम मालकाचा कोणताही सहभाग आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासनाने आपल्या फिर्यादीत केली आहे.

याशिवाय, या गुटखा साठ्यामागील विक्रेता, पुरवठादार, उत्पादक आणि इतर संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन संपूर्ण पुरवठा साखळी उघड करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. अवैध गुटखा विक्रीतून संघटित गुन्हेगारी आणि आर्थिक लाभाचे रॅकेट कार्यरत असल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जळगाव शहरातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून, आगामी काळात अशा साठेबाजांविरुद्ध धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.

Related Posts

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !
जळगाव

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !
जळगाव

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026
भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !

July 16, 2026
स्वयंपाक करताना अज्ञात प्राण्याचा चावा; विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू, गावात भीतीचे वातावरण !
क्राईम

स्वयंपाक करताना अज्ञात प्राण्याचा चावा; विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू, गावात भीतीचे वातावरण !

July 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group