• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 22, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२  जुलै २०२६ 

रावेर तालुक्यातील गारखेडा येथे जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याने काकाची लाकडी काठीने मारहाण करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर हा प्रकार अपघात असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी मृतदेह नाल्याच्या कडेला टाकण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले. या प्रकरणी रावेर पोलिसांनी अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा उलगडा करत आरोपी अनिल जखा बारेला (वय २९, रा. गारखेडा, ता. रावेर) याला २२ जुलै रोजी रात्री अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाल पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील गारखेडा गावात रामा थावरू बारेला (वय ४६) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत नाल्यालगत पडलेला असल्याची माहिती गावातील पोलिस पाटलांनी रावेर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळी मृताच्या डोक्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापतीच्या खुणा आढळून आल्याने हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्यानुसार तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली.

सखोल तपासात मयत रामा बारेला आणि त्यांचा पुतण्या अनिल बारेला यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून सातत्याने वाद सुरू असल्याचे निष्पन्न झाले. २१ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर संतापाच्या भरात अनिल बारेला याने लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर जोरदार वार केला.

डोक्याला गंभीर मार लागल्याने रामा बारेला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह सुमारे २० ते २५ मीटर अंतरापर्यंत ओढत नेऊन नाल्याच्या कडेला टाकला, जेणेकरून हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचे भासावे.  मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती, जखमांचे स्वरूप आणि पोलिसांच्या बारकाईच्या तपासामुळे हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. संशयित म्हणून ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान अनिल बारेला याने गुन्ह्याची कबुली दिली.

याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या हत्येमागील इतर कारणांचा तसेच घटनेच्या सर्व पैलूंचा तपास रावेर पोलिसांकडून सुरू आहे.  या घटनेमुळे गारखेडा गावात खळबळ उडाली असून, क्षुल्लक वादातून नात्यांचे रक्तरंजित रूप समोर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Posts

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !
जळगाव

असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026
पिंप्राळ्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची वरुणराजाकडे प्रार्थना
जळगाव

पिंप्राळ्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची वरुणराजाकडे प्रार्थना

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026
पिंप्राळ्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची वरुणराजाकडे प्रार्थना

पिंप्राळ्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची वरुणराजाकडे प्रार्थना

September 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group