जळगाव मिरर | ३१ जुलै २०२६
दुकानाजवळ येऊन पांढऱ्या रंगाच्या गोळ्या घेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका ७२ वर्षीय वृद्ध दुकानदाराला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्यांची सून वी सून भांडण सोडविण्यासाठी आली असता तिच्यावर चाकूने वार केले. ही घटना दि. २९ रोजी मासुमवाडी परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मासुमवाडी परिसरात राहणारे शेख अजीज शेख नजीर (वय ७२) हे दि. २९ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मासुमवाडीतील त्यांच्या दुकानासमोर काम करत होते. त्यावेळी परिसरातीलच संशयित शेख नयुम शेख कलीम उर्फ बुलेट हा त्यांच्याजवळ आला. त्याने हातात पांढऱ्या रंगाच्या गोळ्या दाखवून ‘तुम्ही सदरच्या गोळ्या घेता का?’ अशी विचारणा केली. फिर्यादीने त्याला, नकार दिला, या गोष्टीचा राग मनात धरून संशयित आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. सासऱ्यांना मारहाण होत असल्याचे पाहून त्यांची सून नसिम शेख हरून ही भांडण सोडवण्यासाठी आली. मात्र, संतापलेल्या आरोपी शेख नयुम उर्फ बुलेट याने त्याच्या हातातील चाकुने सून नसिम हिच्या हनुवटीवर वार करून दुखापत केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.




















