जळगाव मिरर | २३ सप्टेंबर २०२६
दारुच्या नशेत असलेल्याला रस्त्याच्या बाजूने चालण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने महेंद्र पांडुरंग जाधव (मराठे) (वय ३५, रा. शिरसोली प्र. न. ता. जळगाव) याने पोलिसांना दगड मारुन फेकला. तसेच शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावून गेला. ही घटना दि. २० सप्टेंबर रोजी रात्री पावणेअकरा वाजता शिरसोली रस्त्यावर घडली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरसोली गावात गणपती विसर्जन बंदोबस्तासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार प्रदीप पाटील हे हजर होते. दरम्यान, दि. २० सप्टेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास विसर्जन मिरवणुक संपल्यानंतर वाहतुक सुरळीत करीत असतांना शिरसोली प्र. बो ते शिरसोली प्र. न दरम्यान असलेल्या मुख्य रस्त्यावरुन संशयित महेंद्र जाधव हा दारुच्या नशेत रस्त्याच्या मध्यभागी चालून वाहतुकीत अडथळा निर्माण करीत होता.
पोलिसांनी मद्यपी महेंद्र जाधव याला रस्त्याच्या कडेला चालण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने महेंद्र जाधव याने पोलिसांना धक्काबुक्की करीत त्यांना दुखापत होईल या उद्देशाने त्यांना दगड मारुन फेकला. तसेच त्यांच्या अंगावर जावून शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहे.




















