जळगाव मिरर | १९ ऑगस्ट २०२६
मोठ्या भावाच्या पत्नीवर अत्याचाराचा प्रयत्न करीत असतांना त्याला विरोध केल्याने त्यांचा गळा आवळून खून करणाऱ्या दीर प्रवीण छगन बैरागी (वय २६, रा. कुंझर, ता. चाळीसगाव) याला जन्मठेपेची तर पुरावे नष्ट केल्याप्रकरणी सासू लिलाबाई छगन बैरागी (वय ५०) यांना तीन वर्ष सक्तमजुरी शिक्षा सुनावली. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांच्या न्यायालयाने मंगळवार दि. १८ ऑगस्ट रोजी हा निकाल दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील माहेर असलेल्या महिलेची चाळीसगाव तालुक्यातील कुंझर येथील सीआयसीएफमध्ये नोकरीस असलेल्या जवानासोबत २०१३ मध्ये विवाह झाला होता. २०१८ मध्ये विवाहितेचे पती चेन्नई येथे नियुक्तीस होते. तर विवाहिता या सासू, सासरे, दीर प्रवीण बैरागी यांच्यासोबत राहत होती. त्यावेळी विवाहितेचा दीर हा तिच्याकडे वाईट नजरेने बघत होता, तर एकवेळेस विवाहितेचा हात पकडून तिच्याकडे शरिरसुखाची मागणी केली होती. त्यामुळे विवाहिता माहेरी राहत होती. परंतू घटनेच्या काही दिवसांपुर्वीच माहेरच्यांनी समजूत काढून सासरी पाठविले होते. सासरी आल्यानंतर विवाहितेचा दीर तिच्याकडे सतत वाईट नजरेने बघत होता.दि. ४ जुलै २०१८ रोजी विवाहितेच्या वडीलांना त्यांच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याचे समजल्यानंतर ते तात्काळ कुंझरला जाण्यासाठी निघाले.
मुलीचा मृतदेह बघताच त्यांना गळफासामुळे जीभ बाहेर आल्याचे दिसले. तसेच तिच्या अंगावर नखांनी ओरबडले होते तर कपड्यांचे बटन तुटलेले असल्याचे दिसल्यामुळे त्यांनी दि. ४ जुलै २०१८ रोजी पोलिसात तक्रार दिल्याने प्रवीण बैरागीसह त्याची आई लिलाबाई छगन बैरागी व आजलसासूविरुद्ध मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल केला होता.
हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांच्या न्यायालयात चालला. यामध्ये सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी पुराव्यांच्या आधारावर प्रभावी युक्तीवाद केल्यामुळे प्रवीण बैरागी याला दोषी ठरवित खून केल्याप्रकरणी जन्मठेप व २० हजारांचा दंड, अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच वर्ष सक्त मजुरी व १० हजारांचा दंड, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्ष सक्त मजुरी व पाच हजारांचा दंड तर पुरावे नष्ट केल्याप्रकरणी लिलाबाई छगन वैरागी (वय ५०) यांना तीन वर्ष सक्तमजुरी व ५ हजारांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच दंडाच्या रकमेतून ३५ हजार रुपये मयत विवाहितेच्या मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
विवाहितेच्या मृतदेहाचे धुळे येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन केले होते. शवविच्छेदन अहवालात विवाहितेला मासीक पाळी सुरु होती तर तिचा गळा आवळून खून केल्याचा अहवाल डॉ. आर. के गढरी यांनी दिला होता. डॉक्टरांनी विवाहितेच्या गळ्यावरील वर्णातील बारीक कण जमा करुन ते न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्यामध्ये गुन्ह्यात वापरलेली दोरी आणि कण त्याच दोरीचे असल्याचे निष्पन्न झाले होते.
पोलिसांच्या तपासात आरोपी प्रवीण बैरागी व त्याची आई ई यांनी यांनी खून र केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच घटनेवेळी मयताजवळ तिची मुलगी झोपलेली होती. घटनेवेळी तिला जाग आल्यामुळे मुलीसह विवाहितेचे वडील, पंच, तपासधिकारी पोनि दिलीप शिरसाठ, जयपाल हिरे, पीएसआय हेमंत शिंदे, यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली पैरवी अधिकारी म्हणून अमोल पाटील यांनी कामकाज पाहिले.




















