जळगाव मिरर | २३ सप्टेंबर २०२६
बॉल खरेदी केल्यानतर पैसे परत देत असतांना सुमित्रा मनोहर खर्चे (वय ४९, रा. रायसोनी नगर) या महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची सोन्याची पोत जबरीने चोरुन नेत चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. ही घटना दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास रायसोनी नगरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रायसोनी नगरात सुमित्रा खर्चे या वास्तव्यास असून त्यांच्या घराच्या कंपाऊंटमध्ये ओम प्रोव्हीजन नावाने किराणा दुकान सुरु केले आहे. दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सुमित्रा खर्चे या दुकानात असतांना दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधलेले दोन जण त्यांच्या दुकानावर आले. त्यातील एकाने बॉल चाहिए म्हणत काऊंटवर ठेवलेल्या बरणीतून एक बॉल काढला आणि बरणीतून सळी बॉल बाहर निकालो म्हणाला त्यावर सुमित्रा खर्चे यांनी तसे होणार नाही तू यातील एक बॉल निवडून घे असे म्हटल्यानंतर त्या तरुणाने साठ रुपये दिले. सुमित्रा खर्चे यांनी बॉलचे ५० रुपये घेतल्यानंतर दहा रुपये काऊंटरवरील बरणीवर ठेवले. त्यावेळी संशयिताने काऊंटरच्या आतमध्ये वाकून खर्चे यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत ओढून ते दुचाकीवरुन पसार झाले.
महिलेने चोर चोर म्हणत आरडाओरड केल्यानंतर त्यांच्या परिसरातील नागरिक धावून आले आणि त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरटे भरधाव वेगाने तेथून मिळून आले. दरम्यान, सुमित्रा खर्चे यांनी रामानंद नगर पोलीसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





















