जळगाव मिरर | २७ सप्टेंबर २०२६
रेल्वेच्या धडकेत शरद जगनाथ ठाकरे (वय ४५, रा. खेडी कढोली, ता. एरंडोल) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना दि. २५ रोजी सकाळच्या सुमारास आशाबाबा नगरजवळील रेल्वे रुळावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथे राहणारे शरद ठाकरे यांचा खोटे नगर परिसरात लॉन्ड्रीचा व्यवसाय होता. दि. २५ रोजी ते आशाबाबा नगरजवळील खांबा क्रमांक ४१७/१७ जवळील रेल्वे रुळावरुन जात होता. याबाबत लोकोपायल यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी वारंवार रेल्वेचा हॉर्न वाजविला, मात्र शरद ठाकरे हे बाजूला न झाल्यामुळे त्यांना भरधाव रेल्वेने धडक दिली. या अपघातात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ठाकरे यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडीयावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या आतेभावाने त्यांची ओळख पटविली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





















