• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बाक हलविण्याच्या वादातून बाप-लेकाला कारने चिरडण्याचा प्रयत्न; बापाचा मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 27, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बाक हलविण्याच्या वादातून बाप-लेकाला कारने चिरडण्याचा प्रयत्न; बापाचा मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ सप्टेंबर २०२६

जामनेर तालुक्यातील पहूर येथे घरासमोरील जागेतील सार्वजनिक बाक इतरत्र हलविण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान बाप-लेकाला कारने चिरडून ठार मारण्याच्या प्रयत्नात झाल्याची धक्कादायक घटना घडली. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने कुंभारी बुद्रुक येथील शेतकरी ज्ञानेश्वर उत्तम मोरे (रा. कुंभारी बुद्रुक) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा यश ज्ञानेश्वर मोरे हा गंभीर जखमी झाला. जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील हिवरखेडा फाट्याजवळ शनिवारी (दि. २६) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारी बुद्रुक येथे घरासमोरील जागेतील बाक इतरत्र हलविण्याच्या कारणावरून ज्ञानेश्वर मोरे यांचा काही व्यक्तींशी वाद झाला होता. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी ज्ञानेश्वर मोरे व त्यांचा मुलगा यश मोरे हे दोघे दुचाकी क्रमांक एमएच १९ बीटी २३०८ वरून पाहूरकडे निघाले होते. दरम्यान, त्यांच्या मागावर असलेल्या बाळू उत्तम जोशी व अन्य दोघांनी (रा. कुंभारी) कार क्रमांक एमएच १९ ईए १७६९ ने पाठलाग केला. हिवरखेडा फाट्याजवळ कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. ही धडक जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दिल्याचा आरोप आहे.  या धडकेत दुचाकीवर मागे बसलेले ज्ञानेश्वर मोरे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दुचाकी चालविणारा त्यांचा मुलगा यश मोरे हादेखील गंभीर जखमी झाला असून, प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण पात्रे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक नमुने संकलित केले. पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपास अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. दरम्यान, घटनेतील संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.  या प्रकरणी पोलिसांनी बाळू उत्तम जोशी यास ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. पुढील तपास पाहूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पात्रे करीत आहेत. मयत ज्ञानेश्वर मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मोरे यांच्या मृत्यूमुळे कुंभारी बुद्रुक गावावर शोककळा पसरली असून, या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : भरधाव रेल्वेच्या धडकेत ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू !

September 27, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने खळबळ; ४३ वर्षीय संशयित पोलिसांच्या ताब्यात !

September 27, 2026
विसर्जनाचा जल्लोष अन् भुसावळात खुनाचा थरार : मित्रानेच गळा आवळून तरुणाला संपवले!
क्राईम

विसर्जनाचा जल्लोष अन् भुसावळात खुनाचा थरार : मित्रानेच गळा आवळून तरुणाला संपवले!

September 27, 2026
वीज तार चोरीचे मोठे रॅकेट उघड : शेतकऱ्यांनी चोरट्यांना रंगेहात पकडले; ११ जण पोलिसांच्या ताब्यात!
क्राईम

वीज तार चोरीचे मोठे रॅकेट उघड : शेतकऱ्यांनी चोरट्यांना रंगेहात पकडले; ११ जण पोलिसांच्या ताब्यात!

September 26, 2026
गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !
जळगाव

गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !

September 26, 2026
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक : भरधाव रेल्वेच्या धडकेत ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू !

September 27, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने खळबळ; ४३ वर्षीय संशयित पोलिसांच्या ताब्यात !

September 27, 2026
बाक हलविण्याच्या वादातून बाप-लेकाला कारने चिरडण्याचा प्रयत्न; बापाचा मृत्यू

बाक हलविण्याच्या वादातून बाप-लेकाला कारने चिरडण्याचा प्रयत्न; बापाचा मृत्यू

September 27, 2026
विसर्जनाचा जल्लोष अन् भुसावळात खुनाचा थरार : मित्रानेच गळा आवळून तरुणाला संपवले!

विसर्जनाचा जल्लोष अन् भुसावळात खुनाचा थरार : मित्रानेच गळा आवळून तरुणाला संपवले!

September 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group