• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 30, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२६

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील कॉपर वायर चोरी, इलेक्ट्रिक मोटार चोरी, महावितरणच्या केबल तसेच सोलर केबल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि चोरीचा मुद्देमाल खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत भंगार दुकानांची तपासणी करून चोरीचा संशय असलेला सुमारे 75 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या पथकाने परिसरातील भंगार खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी केली.  पोलिसांनी भोकरी तसेच लोहार्‍याच्या कु-हाड गावातील भंगार दुकानांवर तपासणी केली. या कारवाईदरम्यान विविध दुकानांमधून कॉपर वायर व अॅल्युमिनियमच्या तारा असा चोरीचा संशयित मुद्देमाल आढळून आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, करीम नदी काकर यांच्या भंगार दुकानातून सुमारे 32 हजार रुपये किमतीची 32 किलो कॉपरची तार, हकीम आब्बास काकर यांच्या दुकानातून सुमारे 9 हजार रुपये किमतीची 10 किलो कॉपरची तार, तर राजू उस्मान काकर यांच्या भंगार दुकानातून सुमारे 1 हजार 400 रुपये किमतीची 14 किलो अॅल्युमिनियमची तार जप्त करण्यात आली.

तसेच लोहार्‍याच्या हद्दीतील कु-हाड गावातील अब्दुल हकीम काकर यांच्या भंगार दुकानातून सुमारे 32 हजार रुपये किमतीची 32 किलो कॉपरची तार आढळून आली. अशा प्रकारे कॉपर व अॅल्युमिनियमच्या तारांसह सुमारे 75 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत संबंधित भंगार दुकानदारांकडे आवश्यक कागदपत्रे तसेच खरेदी-विक्रीचा पुरावा मागण्यात आला. मात्र समाधानकारक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील कलम 124 अन्वये चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर मुद्देमालाचा चोरीच्या इतर गुन्ह्यांशी संबंध आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या कारवाईमुळे चोरीचा माल खरेदी-विक्री करणाऱ्या भंगार व्यावसायिकांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या शेतातील कॉपर वायर, इलेक्ट्रिक मोटारी, महावितरणच्या केबल तसेच सोलर केबल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी भंगार बाजारातील व्यवहारांची तपासणी करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, चाळीसगाव परिमंडळाचे पोलीस अधिकारी तसेच पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्यासह पोलीस कर्मचारी अतुल पवार, अभिजित निकम, दीपक अहिरे, प्रवीण देशमुख, भारत पाटील, शाम हटकर, मनोज वडगुजर आणि नामदेव इंगळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पेन्शन कार्डच्या आमिषाने प्रोफेसरची ऑनलाइन फसवणूक; खात्यातून ३ लाख ८५ हजार गायब

September 30, 2026
संवेदनशील गावांवर पोलिसांची ‘नजर’; गोपनीय शाखेच्या अंमलदारांची विशेष कार्यशाळा
क्राईम

संवेदनशील गावांवर पोलिसांची ‘नजर’; गोपनीय शाखेच्या अंमलदारांची विशेष कार्यशाळा

September 30, 2026
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी; १२ तासांनी मृतदेह बाहेर !
क्राईम

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी; १२ तासांनी मृतदेह बाहेर !

September 30, 2026
खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता
क्राईम

खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

September 29, 2026
कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !
जळगाव

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

September 29, 2026
हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू
क्राईम

हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

September 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पेन्शन कार्डच्या आमिषाने प्रोफेसरची ऑनलाइन फसवणूक; खात्यातून ३ लाख ८५ हजार गायब

September 30, 2026
चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !

चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !

September 30, 2026
संवेदनशील गावांवर पोलिसांची ‘नजर’; गोपनीय शाखेच्या अंमलदारांची विशेष कार्यशाळा

संवेदनशील गावांवर पोलिसांची ‘नजर’; गोपनीय शाखेच्या अंमलदारांची विशेष कार्यशाळा

September 30, 2026
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी; १२ तासांनी मृतदेह बाहेर !

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी; १२ तासांनी मृतदेह बाहेर !

September 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group