जळगाव मिरर | २ ऑक्टोंबर २०२६
घराच्या परिसरात शतपावली करीत असतांना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी लक्ष्मीबेन शंकरलाल पटेल (वय ७२, रा. राज केसर बंगलो गणपतीनगर) यांच्या गळ्यातून २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरीने चोरुन नेली. ही घटना दि. १ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गणपती नगरातील जीएसटी भवनाजवळ घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गळयतील चैन चोरट्यांनी ओढून नेल्यामुळे लक्ष्मीबेन पटेल यांनी आरडाओरड केली. मात्र तो पर्यंत चोरटे तेथून पसार झाले होते. दरम्यान, घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रात्री अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.


















