जळगाव मिरर | २४ ऑक्टोंबर २०२६
पारोळा शहरातील महामार्गावर असलेल्या तलाठी कॉलनीजवळ पिकअप गाडीने दुचाकीस्वार तरुणाला धडक दिल्याने २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २२ रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा शहरातील महार्गाजवळ २२ रोजी सायंकाळी ७ वाजता तालुक्यातील म्हसवे येथील विशाल संजय पाटील (वय २६) हे दुचाकी (एमएच- १९, डीसी- ६९६८) ने पारोळा येथे कामानिमित्त येत येत होते. तर, पारोळ्याकडून जळगावाकडे जाणारी पिकअप गाडी (एमएच ४७, एबी-५९३२) ने तलाठी कॉलनीजवळ दुचाकीवर असलेल्या विशाल पाटील यास जबर धडक दिली. या दुर्दैवी अपघातात विशालच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, घटनेनंतर पिकअप गाडीचा चालक फरार झाला आहे. याबाबत चिंतामण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस कॉन्स्टेबल कैलास साळुंखे करत आहेत.




















