• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शासनाच्या आवाहनावर बांबू लागवड केली; सात वर्षांनंतरही बाजारपेठ नाही! शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 18, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
शासनाच्या आवाहनावर बांबू लागवड केली; सात वर्षांनंतरही बाजारपेठ नाही! शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ नोव्हेंबर २०२६

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात शासनाच्या आवाहनाला आणि बांबू लागवडीच्या भविष्यातील उत्पन्नाच्या आश्वासनांना विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बांबू लागवड केली. पारंपरिक शेतीला पर्याय, कमी खर्चात अधिक उत्पन्न आणि भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. मात्र आज सात वर्षांनंतरही या शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्नाऐवजी निराशाच आली आहे.

बांबूची लागवड केल्यानंतर साधारण पाच वर्षांनी त्यापासून व्यावसायिक उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. मात्र लागवडीला सात वर्षे उलटून गेल्यानंतरही बांबू खरेदीसाठी पुरेशी बाजारपेठ नाही, खरेदीदार नाहीत, योग्य दराची हमी नाही आणि शासनाकडून ठोस व्यवस्था झालेली नाही. मग शेतकऱ्यांनी नेमके करायचे तरी काय?

या संपूर्ण प्रश्नाची झळ स्वतः अनुभवणारे शेतकरी गजानन मालपुरे यांनी सहा एकर क्षेत्रात सात वर्षांपूर्वी बांबू लागवड केली. शासनाच्या आवाहनावर आणि या पिकातून चांगले उत्पन्न मिळेल या अपेक्षेने त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र आज बांबू तयार असूनही विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.  एकरी किमान ५० हजार रुपये वार्षिक उत्पन्न मिळेल, असे गृहीत धरले तरी सहा एकरांसाठी वर्षाला तीन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. आठ वर्षांचा हिशेब केला तर तब्बल २४ लाख रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. हा केवळ एका शेतकऱ्याचा हिशेब आहे. अशा प्रकारे अनेक शेतकऱ्यांनी बांबू लागवड केली असेल, तर एकूण नुकसान किती मोठे असेल, याची कल्पनाच केलेली बरी!

आमदारांच्या राजकीय फायद्यासाठी शेतकऱ्यांचा वापर झाला का?

बांबू लागवडीचा प्रचार करताना शासन आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी मोठमोठी आश्वासने दिली. मात्र शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष लागवड केल्यानंतर त्यांच्या उत्पादनाची खरेदी कोण करणार, प्रक्रिया उद्योग कुठे उभारणार, बाजारपेठ कशी उपलब्ध करून देणार, याचे नियोजन कुठे गेले? शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यामागे नेमके कोणाचे हित होते? या योजनेतून कोणाला फायदा झाला? सत्ताधारी आमदारांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता का केली नाही? या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत.  शेतकऱ्यांच्या नावावर राजकीय प्रसिद्धी मिळवायची, योजनांचा गाजावाजा करायचा आणि प्रत्यक्ष अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना एकटे सोडायचे, हीच जर शासनाची भूमिका असेल तर यापेक्षा दुर्दैवी बाब कोणती?

मग शेतकऱ्यांनी जगायचे कसे?

शेतकरी कर्ज काढतो, जमीन कसतो, पिकासाठी रात्रंदिवस मेहनत करतो. शासनाच्या आवाहनावर नवीन पीकपद्धती स्वीकारतो. मात्र उत्पादन तयार झाल्यावर बाजारपेठच मिळत नसेल, तर त्या शेतकऱ्याने कर्ज फेडायचे कसे? मुलांचे शिक्षण करायचे कसे? कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा?   शेतकऱ्यांना अशा प्रकारे आश्वासनांच्या जाळ्यात अडकवून आर्थिक संकटात ढकलले जात असेल, तर त्यांच्या वाढत्या नैराश्याला जबाबदार कोण? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल भाषणे करणाऱ्या शासनाने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रत्यक्षात काय केले, याचा हिशेब दिला पाहिजे.

शासनाने तातडीने उत्तर द्यावे!

* जळगाव जिल्ह्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांची अधिकृत नोंद करून घ्यावी.
* बांबू खरेदीसाठी शासकीय हमी आणि निश्चित दराची व्यवस्था करावी.
* पाचोरा तालुक्यात बांबू प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा.
* बांबू उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीचे सर्वेक्षण करावे.
* बाजारपेठ उपलब्ध न झाल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत द्यावी.
* बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या यंत्रणेची आणि दिलेल्या आश्वासनांची चौकशी करावी.

शेवटी शासनाला एकच सवाल – शेतकऱ्यांनी तुमच्या आवाहनावर विश्वास ठेवून बांबू लावला, जमीन अडकवली, पैसा खर्च केला आणि सात वर्षे वाट पाहिली. आता बांबू विकण्यासाठी बाजारपेठ नाही, तर या शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे? शेतकऱ्यांच्या नावावर योजना राबवून त्यांनाच आर्थिक संकटात टाकणे हा विकास नसून शेतकऱ्यांच्या विश्वासाचा विश्वासघात आहे. शेतकऱ्यांना स्वप्ने दाखवून त्यांच्या स्वप्नांची राख करणाऱ्या व्यवस्थेला आता जाब विचारण्याची वेळ आली आहे. शासनाने केवळ बांबू लावण्याचे आवाहन करू नये, तर तो विकला जाईल याची जबाबदारीही स्वीकारावी!

– गजानन मालपुरे
बांबू उत्पादक शेतकरी, सहा एकर बांबू लागवड पाचोरा, जिल्हा जळगाव

Related Posts

रस्ता अडला अन् चिमुकल्याचा श्वास थांबला : वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू
क्राईम

रस्ता अडला अन् चिमुकल्याचा श्वास थांबला : वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

November 18, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नात्याला काळिमा : चुलत मामाकडून सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार; जळगावात घडली घटना !

November 18, 2026
गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा थरार : चौथ्या मजल्यावरून घेतली तरुणाने उडी !
क्राईम

गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा थरार : चौथ्या मजल्यावरून घेतली तरुणाने उडी !

November 18, 2026
दुर्देवी : ३ वर्षीय मुलीला विद्युत शॉक लागून मृत्यू !
क्राईम

विजेच्या खांबावर चढताच तरुणाला जोरदार धक्का !

November 18, 2026
जळगावात ६७ रक्तदात्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिवसानिमित्त रक्तदान
जळगाव ग्रामीण

जळगावात ६७ रक्तदात्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिवसानिमित्त रक्तदान

November 17, 2026
बीएचआर ठेवीदारांच्या पैशांसाठी राजूमामा मैदानात : सहकारमंत्र्यांची घेतली भेट; ठेवी व्याजासह परत देण्याची मागणी
जळगाव

बीएचआर ठेवीदारांच्या पैशांसाठी राजूमामा मैदानात : सहकारमंत्र्यांची घेतली भेट; ठेवी व्याजासह परत देण्याची मागणी

November 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
रस्ता अडला अन् चिमुकल्याचा श्वास थांबला : वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

रस्ता अडला अन् चिमुकल्याचा श्वास थांबला : वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

November 18, 2026
शासनाच्या आवाहनावर बांबू लागवड केली; सात वर्षांनंतरही बाजारपेठ नाही! शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर!

शासनाच्या आवाहनावर बांबू लागवड केली; सात वर्षांनंतरही बाजारपेठ नाही! शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर!

November 18, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नात्याला काळिमा : चुलत मामाकडून सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार; जळगावात घडली घटना !

November 18, 2026
गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा थरार : चौथ्या मजल्यावरून घेतली तरुणाने उडी !

गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा थरार : चौथ्या मजल्यावरून घेतली तरुणाने उडी !

November 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group