• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 22, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ नोव्हेंबर २०२६

राजस्थानमध्ये तीर्थयात्रेवर गेलेल्या धुळ्यातील एका कुटुंबावर परतीच्या प्रवासात काळाने घाला घातला. कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर भरधाव क्रूझर वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकले. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला असून, लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास नाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभूपुरा गावाजवळ ही हृदयद्रावक घटना घडली. अपघातात क्रूझर वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

धुळे येथील ३६ नातेवाईकांचा समूह मंगळवारी धार्मिक तीर्थयात्रेसाठी तीन वेगवेगळ्या वाहनांतून रवाना झाला होता. या यात्रेत मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर आणि उज्जैन, राजस्थानमधील सांवरिया सेठ, अजमेर, पुष्कर तसेच खाटू श्यामजी या धार्मिक स्थळांना भेट देण्यात आली. शनिवारी खाटू श्यामजीचे दर्शन घेतल्यानंतर समूह परतीच्या प्रवासाला निघाला होता.  रात्री साडेदहाच्या सुमारास जयपूर येथे समूहातील सदस्यांनी जेवणासाठी थांबा घेतला. त्यानंतर पहिली गाडी सुमारे अर्धा तास आधी पुढे रवाना झाली. दुसऱ्या वाहनातील कुटुंबीय कोटाच्या दिशेने जात असताना शंभूपुरा परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला त्यांची क्रूझर जोरदार धडकली.

या अपघातात सज्जन (६२), त्यांची पत्नी उषाबाई (६०), बाबूलाल (७५), त्यांची पत्नी सुशीला (६२), मुलगा कैलास (३५), कैलासची पत्नी अनिता (३४), जान्हवी (७), माधवी (३२) आणि सान्वी (३) यांचा मृत्यू झाला. सज्जन आणि बाबूलाल हे सख्खे भाऊ होते. सान्वी ही सज्जन यांची नात, तर माधवी त्यांची सून होती. कैलास सलून व्यवसायात कार्यरत होता. क्रूझरमधील प्रवासी एकाच कुटुंबातील नातेवाईक होते. या दुर्घटनेमुळे धुळे येथील त्यांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघातानंतर क्रूझर वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. अनेक प्रवासी वाहनाच्या आत अडकले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अत्यंत प्रयत्नांनंतर अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि जखमींना रुग्णवाहिकेद्वारे न्यू मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.  पोलिस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्याची पाहणी केली. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आशुतोष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर माधवी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यापैकी मनीषा यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

प्राथमिक तपासात वाहन चालकाला डुलकी लागल्यामुळे क्रूझरवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. तीर्थयात्रेचा आनंद घेत एकत्र प्रवास करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने धुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यात्रेतील आनंदाचे क्षण काही तासांतच शोकांतिकेत बदलले.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घरासाठी साठवलेली दीड लाखांची पुंजी चोरट्यांनी लुटली!

November 22, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फेसबुकवर मैत्री, लग्नाचे आमिष अन् पाच वर्षे अत्याचार : जळगावात धक्कादायक घटना !

November 22, 2026
तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर विद्यालयाची १०० ग्रीन आर्मी सज्ज!
जळगाव ग्रामीण

तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर विद्यालयाची १०० ग्रीन आर्मी सज्ज!

November 21, 2026
वर्षभरापासून जीवघेणा खड्डा : २० अपघातांनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष; नारळाचा ट्रक उलटला! !
क्राईम

वर्षभरापासून जीवघेणा खड्डा : २० अपघातांनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष; नारळाचा ट्रक उलटला! !

November 21, 2026
ट्रॅक्टरवरील ताबा सुटला अन् थेट कालव्यात कोसळला; युवकाचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

ट्रॅक्टरवरील ताबा सुटला अन् थेट कालव्यात कोसळला; युवकाचा दुर्देवी मृत्यू !

November 21, 2026
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच प्रोग्राम अंतर्गत ५० कोटी रुपयांच्या कर्जांना मंजुरी आणि वितरण
जळगाव ग्रामीण

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच प्रोग्राम अंतर्गत ५० कोटी रुपयांच्या कर्जांना मंजुरी आणि वितरण

November 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

November 22, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

घरासाठी साठवलेली दीड लाखांची पुंजी चोरट्यांनी लुटली!

November 22, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

फेसबुकवर मैत्री, लग्नाचे आमिष अन् पाच वर्षे अत्याचार : जळगावात धक्कादायक घटना !

November 22, 2026
तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर विद्यालयाची १०० ग्रीन आर्मी सज्ज!

तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर विद्यालयाची १०० ग्रीन आर्मी सज्ज!

November 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group