
जळगाव : प्रतिनिधी
आपल्या छंदाला किंवा आपल्या जे करायचे असते त्याला फक्त जिद्द असावी लागते, त्याला वेळ किंवा वय असावे असे काही नसते जळगावात हि एका ८४ वर्षाच्या आजीबाईंनी चक्क सोशल मीडियावर सुरु असलेल्या ऑनलाईन शिवरात्री उत्साहात सहभाग घेऊन घरीच मातीचे शिवलिंग साकारले आहे.
शहरातील एका आजीबाईंनी मातीची शिवलिंग तयार केली आहे. आजच्या सोशल मीडियाच्या युगात मनोरंजनासोबत आपल्यात उपजत असलेल्या गुणांचा विकास करण्याची संधी दिली जाते. परंतु या संधीचे सोने करणे हे आपल्याच हातात असते. इंदोर प्रदीप मिश्राजी यांच्यासोबत ऑनलाइन शिवरात्री उत्सवात मलकापूर चाळीसबिघा परिसरातील श्रीमती रत्नप्रभा गांधी (वय ८४) यांनी स्वतः मातीची सुंदर शिवलिंग तयार करून ‘शिवलिंग पूजा’ उत्सवात सहभाग नोंदवला. या वयात भक्ती भावाने व तितक्याच उत्साहाने नवीन कलाकृती तयार करण्याचा छंद हे खरोखरच उल्लेखनीय आहे. याआधी त्यांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम’चे लेखन शॉलवर सव्वा लाख वेळा केले आहे, तसेच टाकाऊ वस्तु पासून नवनवीन कलाकृती तयार करण्याचा छंद आजही त्यांनी जोपासला आहे.




















