
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून देशातील नागरिक महागाईने खूपच त्रस्त आहेत. जीवनावश्यक वस्तूचे दरही गगनाला भिडले आहेत. या निराशजनक स्थितीत महागाईवर सर्वसामान्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. खाद्यतेलात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वस्तूंच्या किमतीबाबत मंगळवारी IMCची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत तेलबियांची किंमत, साठा मर्यादा यावर फेरविचार करण्यात येणार आहे. याशिवाय स्टॉक लिमिट आणि पामतेल फ्युचर्स यावरही चर्चा होणार आहे. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
किमतीत 8-15 रुपये कपात होणार?
याआधी शुक्रवारी अन्न सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अन्न मंत्रालयाने सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाबाबत चर्चा केली. बैठकीत खाद्यतेलाची एमआरपी प्रतिलिटर 8 ते 15 रुपयांनी कमी करण्यास सांगण्यात आले आहे. पाम तेलाच्या TRQ प्रमाण आणि फ्युचर्स ट्रेडिंगबद्दलही चर्चा झाली. त्याचा भावावर होणारा परिणाम याबाबतही चर्चा झाली.
अन्न सचिवांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत अन्न मंत्रालयाने सूर्यफूल आणि सोया तेलाबाबत चर्चा केली. या बैठकीत खाद्य तेलाच्या किमती 8 ते 15 रुपयांनी कमी करण्याचे सांगण्यात आले. पाम तेलाचे TRQ प्रमाण आणि फ्युचर्स ट्रेडिंग यावर चर्चा झाली. अन्न सचिवांनी खाद्यतेल संघटनांना आयातीवरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्यास आणि देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सरकारसोबत काम करण्यास सांगितले.




















