
आपण समाजात वावरत असतांना नेहमी वयोवृद्ध व भारतीय जवानांचा नेहमीच सन्मान करीत असतो परंतु समाजात असेही काही लोक असतात कि त्यांना वय व पदाचा सन्मान करता येत नाही, अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे की एक महिला भारतीय सेवानिवृत्त सेवानिवृत्त जवानाला शिवीगाळ करीत काठीने मारहाण करीत आहे.
एका निवृत्त माजी सैनिकाला काठीने मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एक महिला शिक्षिका या सैनिकाला मारहाण करत आहे. या प्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या प्रकरणामुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कारण ती महिला सैनिकाला खुलेआम अश्लील शिवीगाळ करत आहे. एवढंच नव्हे तर तुझ्यासारखे अनेक पाहिले अशा शब्दात त्याचा अपमान करत आहे. त्यामुळे भारतीय सैनिकाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात यावी अशी मागणी काही नेटकरी करत आहेत.
https://twitter.com/IndiaGender/status/1558826856463273986?s=20&t=BdHdZnIYeU30FO31JaHYoQ
ही चकित करणारी घटना आग्रा पोलीस ठाण्याच्या मागील बाजूला असणाऱ्या LIC ऑफिसर कॉलनीत घडली आहे. या कॉलनीमध्ये निवृत्त भारतीय सैनिक सुरक्षा रक्षकाचं काम करतो. हा सुरक्षारक्षक कॉलनीत घुसलेल्या कुत्र्यांना बाहेर काढत होता. त्यावेळी एका महिलेने त्यांच्याशी वाद घातला. एवढंच नव्हे तर त्यांनी कॉलनीमधील कुत्र्यांची हत्या केली असा गंभीर आरोप करत त्यांना मारहाण देखील केली. त्यांना अश्लील शिव्या घातल्या. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेतली आहे. अखिलेश सिंह असं या सुरक्षारक्षकाचं नाव आहे. त्यांनी या प्रकरणी महिलेविरोधात पोलीस तक्रार केली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. शिवाय गुन्हेगाराला लवकरच शिक्षा केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.




















